सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांना प्रारंभ, पहिल्याच दिवशी सत्तार हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
By बाळकृष्ण दोड्डी | Published: June 19, 2023 05:55 PM2023-06-19T17:55:08+5:302023-06-19T17:55:27+5:30
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. गौतम कांबळे आणि परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर आदींनी शहरातील परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.
सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा सोमवारपासून सुरुवात झाली आहेत. ७० केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात असून पहिल्याच दिवशी २७ हजार १३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ३१ जुलै पर्यंत चालणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी विद्यापीठ प्रशासनाकडून ११० परीक्षा केंद्राची रचना करण्यात आली आहे. सुमारे ७५ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. गौतम कांबळे आणि परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर आदींनी शहरातील परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून माहे मार्च-एप्रिल २०२३ च्या उन्हाळी सत्राच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा १९ जून ते ३१ जुलै यादरम्यान नियोजित आहेत. सोमवारी, बीए, बीकॉम, बीएससी, बीबीए, बीसीए, बी, बिपीएड, एमएड, एम पी ए एड, बी टेक आदी अभ्यासक्रमांच्या परीक्षेपासून विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे.