सोलापूर विद्यापीठाकडून वाचकांसाठी 'मोबाईल ॲप'चे अनावरण; कुलगुरूंच्या हस्ते वाचक पुरस्कारांचेही वितरण
By बाळकृष्ण दोड्डी | Published: February 6, 2023 06:15 PM2023-02-06T18:15:38+5:302023-02-06T18:16:30+5:30
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्रमार्फत माय ई-केआरसी मोबाईल ॲपचे अनावरण सोमवारी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याहस्ते झाले.
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्रमार्फत माय ई-केआरसी मोबाईल ॲपचे अनावरण सोमवारी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याहस्ते झाले. यावेळी उत्कृष्ट वाचक विद्यार्थिनी, विद्यार्थी व शिक्षक पुरस्काराचेही वितरण डॉ. फडणवीस यांच्याहस्ते झाले.
सोमवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्रमार्फत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, प्रमुख अतिथी ज्येष्ठ कवी डॉ. राजेंद्र दास, कुलसचिव योगिनी घारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ज्ञानस्रोत केंद्रात असलेल्या उपलब्ध पुस्तके, ग्रंथ, कथा, कादंबरी, मासिके, जर्नल्स तसेच ई-बुक्स इत्यादी साहित्यकृतींची परिपूर्ण माहिती असलेल्या व विद्यार्थ्यांना उपयोगी असणाऱ्या माय ई-केआरसी मोबाईल ॲपचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले. किशोर येले यांनी मोबाईल ॲप संदर्भात यावेळी माहिती दिली.