सोलापूर विद्यापीठ नामांतर ‘जैसे थे’ ठेवण्याचाआदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 12:49 AM2018-05-26T00:49:24+5:302018-05-26T00:49:24+5:30
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय जाहीर करत येत्या ३१ मे रोजी जाहीर कार्यक्रमात नामविस्तार करण्याची घोषणा केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्याच्या निर्णयाला ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. ५ जून रोजी यावर सुनावणी होणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय जाहीर करत येत्या ३१ मे रोजी जाहीर कार्यक्रमात नामविस्तार करण्याची घोषणा केली होती. याविरूद्ध शिवा संघटना न्यायालयात गेली होती.
विद्यापीठाला पुण्यश्लोक होळकर यांचे नाव देण्यावरून धनगर समाज आणि लिंगायत समाज आमने-सामने आले होते. मात्र याप्रकरणी राज्य सरकारने या दोन्ही समाजात समेट घडवून आणत विद्यापीठास पुण्यश्लोक होळकर यांचे नाव देत नामविस्तार करण्याचा निर्णय घेतला.