सोलापूर-विजयपूर महामार्ग रोखला; सीना नदीत पाणी सोडा म्हणून शेतकऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 02:10 PM2021-04-27T14:10:28+5:302021-04-27T14:31:16+5:30

दक्षिण सोलापुरात पाण्यासाठी संचारबंदीत आंदोलन

Solapur-Vijaypur highway blocked; Farmers sit on the bridge as water is released into the Sinai River | सोलापूर-विजयपूर महामार्ग रोखला; सीना नदीत पाणी सोडा म्हणून शेतकऱ्यांचे आंदोलन

सोलापूर-विजयपूर महामार्ग रोखला; सीना नदीत पाणी सोडा म्हणून शेतकऱ्यांचे आंदोलन

googlenewsNext

सोलापूर : एप्रिल महिन्यात सीना नदी कोरडीठाक पडल्याने सोलापूर परिसरातीलशेतकरी आक्रमक झाले आहेत. मंगळवारी दुपारी परिसरातील शेतकऱ्यांनी वडकबाळ येथील पुलावर ठिय्या मारला.
उन्हाळी हंगामातील उजनी धरणातून सोडलेले पाणी वडकबाळ औराद कोरेगाव परिसरात पोहोचलेच नाही त्यामुळे सीना नदी ठणठणीत आहे ामुळे नदीकाठचे पिके जळून चालले आहेत.  पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. मंगळवारी दुपारी या परिसरातील शेतकरी वडकबाळ जवळ एकत्र आले, त्यांनी सीना नदीवरील पुलावर ठिय्या मारला. याच दरम्यान तेथून मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक थिटे तेथून जात होते, त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली व मंद्रूप पोलीस ठाण्यात त्यांना नेऊन निवेदन स्वीकारले. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनीही शेतकऱ्यांशी चर्चा केली. कोरोना महामारीमुळे संचारबंदी लागू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये अशी नी विनंती केली. त्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले व एक मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला.
 

Web Title: Solapur-Vijaypur highway blocked; Farmers sit on the bridge as water is released into the Sinai River

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.