मराठी नाट्य परिषदेच्या ‘कार्यकारिणी’साठी सोलापूरचे चौघे लढणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 10:08 AM2018-03-20T10:08:34+5:302018-03-20T10:08:34+5:30

नाट्य परिषद निवडणूक : ६ एप्रिल रोजी मुंबईत होणार मतदान

Solapur will fight for the executive committee of Marathi Natya Parishad | मराठी नाट्य परिषदेच्या ‘कार्यकारिणी’साठी सोलापूरचे चौघे लढणार !

मराठी नाट्य परिषदेच्या ‘कार्यकारिणी’साठी सोलापूरचे चौघे लढणार !

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठानच्या सभागृहात मतदान होणार१४ मार्च ते १९ मार्चदरम्यान निवडणूक अर्ज भरण्याची मुदतनियामक मंडळाच्या निवडणुकीत ६० सदस्य विजयी

रवींद्र देशमुख 
सोलापूर: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाची निवडणूक झाल्यानंतर आता एकोणीस सदस्यांच्या कार्यकारिणीसाठी ६ एप्रिल रोजी मतदान होणार असून, सोलापूरचे चार नवनिर्वाचित सदस्य आता १ सहकार्यवाह आणि तीन सदस्यत्वाच्या जागा मिळविण्यासाठी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.

मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठानच्या सभागृहात मतदान होणार असून, १४ मार्च ते १९ मार्चदरम्यान निवडणूक अर्ज भरण्याची मुदत आहे. सोलापूर जिल्ह्यातील नाट्य परिषदेच्या आठ शाखांच्या वतीने सहकार्यवाहपदासाठी पंढरपूरचे दिलीप कोरके आणि ३ कार्यकारिणी सदस्यपदासाठी उपनगरीय शाखेचे जे. पी. कुलकर्णी, सोलापूर शाखेचे आनंद खरबस आणि सांगोल्या शाखेचे चेतनसिंह केदार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. २० मार्च रोजी अर्जांची छाननी होणार आहे. २५ मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून, त्यानंतर मतदान होणार आहे.

नाट्य परिषदेच्या राज्यभरात झालेल्या नियामक मंडळाच्या निवडणुकीत ६० सदस्य विजयी झाले. काही ठिकाणी बिनविरोध निवडणुकाही झाल्या. नियामक मंडळाचे हे ६० सदस्य कार्यकारिणीच्या निवडणुकीतील मतदार आहेत. सोलापुरातून नियामक मंडळावर वरील चार उमेदवारांसह सोमेश्वर घाणेगावकर (बार्शी), यतिराज वाकळे (मंगळवेढा) हे विजयी झाले होते. हे सहाही जण कार्यकारिणीसाठीच्या मतदानासाठी मुंबईला जाणार आहेत.

नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मोहन जोशी पॅनलकडून डॉ. अमोल कोल्हे हे निवडणूक लढवित आहेत; तर प्रसाद कांबळी हे त्यांना लढत देत आहेत. अध्यक्षपदासाठी ३१ ही मॅजिक फिगर असून, सोलापुरातील जोशी पॅनलच्या समर्थकांनी ३५ सदस्य आपल्या बाजूने असल्याचा दावा केला आहे.

प्रमुख पदाधिकारी मुंबईचेच !
- नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीतील अध्यक्ष, कोषाध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि उपाध्यक्ष (प्रशासकीय) ही पदे नेहमीच मुंबईतील सदस्यांकडे दिली जातात. परिषदेचे निर्णय तातडीने घेण्याची निकड निर्माण झाली तर तसे निर्णय घेता यावेत, यासाठीच प्रमुख पदाधिकारी मुंबईचे असणे गरजेचे आहे, ही भूमिका आहे. यापार्श्वभूमीवर सोलापूरने कार्यकारिणीतील प्रमुख पदाची मागणी केली नाही. सहकार्यवाहपद आणि तीन सदस्य अशी मागणी केली आहे, असे नाट्य परिषदेच्या उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

कार्यकारिणी अशी आहे..

  • - अध्यक्ष, २ उपाध्यक्ष (प्रशासकीय, कार्यक्रम), ३ सहकार्यवाह, १ कोषाध्यक्ष,१  प्रमुख कार्यवाह आणि ११ कार्यकारिणी सदस्य. ही कार्यकारिणी १९ जणांची असून, नियामक मंडळाचे सदस्य यंदा मतदानाद्वारे कार्यकारिणी निवडणार आहेत.

Web Title: Solapur will fight for the executive committee of Marathi Natya Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.