Solapur: 'तू मला हो म्हण, नाहीतर तुझा नवरा गेलाच समज!', महिलेला धमकी, आरोपीविरोधात गुन्हा दाखल
By रूपेश हेळवे | Published: July 29, 2023 01:15 PM2023-07-29T13:15:20+5:302023-07-29T13:16:12+5:30
Crime News: महिलेचा वारंवार पाठलाग करत तिच्या नवरा व मुलांना मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी इसमावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
- रुपेश हेळवे
सोलापूर : महिलेचा वारंवार पाठलाग करत तिच्या नवरा व मुलांना मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी इसमावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. अनिल परगोंडा सातलंगाव ( वय ४५, रा. सोलापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेने फिर्याद दिली आहे.
पीडितेच्या फिर्यादीनुसार आरोपी अनिल हा पीडितेच्या मोबाईलवर वारंवार मॅसेज करत त्यांचा पाठलाग करत होता. त्याला समजवून सांगून ही तो ऐकता नव्हता. दरम्यान, पीडिता ही दुचाकीवरून जात असताना आरोपी हा त्याचा पाठलाग करत होता. याबाबत पीडितेने आरोपीला विचारणा केली. तेव्हा तू मला हो म्हण नाहीतर मी असंच तुझा पाठलाग करणार, जर तू हो म्हणाली नाही तर तुझा नवरा तर गेलाच आणि तुझे मुलं तरी घरी येतात का बघ अशी धमकी दिली.
ही घटना ८ जुलै रोजी घडली. त्यानंतर आरोपीने पीडितेचा पिच्छा सुरूच ठेवला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.