सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ राजेंद्र भारूड यांचा शिवसेनेने केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:16 PM2018-09-25T12:16:00+5:302018-09-25T12:22:20+5:30
सोलापूर : झेडपीच्या विविध उपक्रमांसाठी गरज म्हणून रंगभवन चौकातील शिवछत्रपती बागेजवळ अत्याधुनिक सभागृह बांधण्याचा प्रस्ताव सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड यांनी तयार केला आहे. रंगभवन चौकात असलेल्या बागेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवून सभागृह बांधकाम करण्यास विरोध करीत संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी मंगळवारी सकाळी सीईओ यांचा निषेध व्यक्त करून पुतळा हटविण्यास कडाडून विरोध केला.
यावेळी बोलताना लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील व शहराध्यक्ष प्रताप चव्हाण म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावू देणार नाही, जिल्हाधिकाºयांचे कार्यालय पाडून तेथे सभागृह बांधा असाही सल्ला दिला. यावेळी शिवसैनिकांनी या प्रकरणाची माहिती देण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजय शिंदे यांच्याशी चर्चा केली़ त्यावेळी या सर्वच मान्यवरांनी शिवसैनिकांची कैफीयत ऐकून घेतली. यावेळी संजय शिंदे यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करू शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलविला जाणार नाही असे आश्वासन दिले.