गावागावातील मुली शाळेत येण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेने वाटल्या १्०० सायकली

By Appasaheb.patil | Published: October 5, 2022 05:15 PM2022-10-05T17:15:56+5:302022-10-05T17:16:03+5:30

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते सायकल बँक उपक्रमातून मुलींना सायकली वाटप

Solapur Zilla Parishad distributed 100 bicycles for the girls of villages to come to school | गावागावातील मुली शाळेत येण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेने वाटल्या १्०० सायकली

गावागावातील मुली शाळेत येण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेने वाटल्या १्०० सायकली

googlenewsNext

सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक १ चे नंबर वन फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुलींसाठी सुरू केलेल्या सायकल बँक उपक्रमाला १०० सायकली देण्यात आल्या. त्यातील प्राधिनिधीक स्वरूपात ११ सायकलींचे वाटप महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते मुलींना वाटप करण्यात आले.

नियोजन भवन येथे दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील ११ मुलींना प्रातिनिधीक स्वरूपात सायकली प्रदान करण्यात आल्या. विद्यार्थिनींना गुलाबपुष्प देऊन विखे-पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, इशाधीन शेळकांदे, कार्यकारी अभियंता पंडीत भोसले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भास्कर बाबर, संजय जावीर, गट विकास अधिकारी बाळासाहेब वाघ, प्रशांत काळे, मल्हारी बनसोडे, बापूसाहेब जमादार, उत्तम सुर्वे उपस्थित होते.

यावेळी पतसंस्थेचे चेअरमन हरिबा सपताळे, ज्येष्ठ संचालक विवेक लिंगराज, तज्ज्ञ संचालक डॉ. एस. पी. माने, ज्येष्ठ संचालक श्रीशैल देशमुख, शहाजहान तांबोळी, दीपक घाडगे, दत्तात्रय घोडके ,सुहास चेळेकर , अनिल जगताप, शेखर जाधव, सुंदरराव नागटिळक, विष्णू पाटील, सुखदेव भिंगे, मृणालिनी शिंदे, सुनंदा यादगिरी, त्रिमूर्ती राऊत, सचिव दत्तात्रय देशपांडे उपस्थित होते. आभार धन्यकुमार राठोड यांनी मानले.

 

Web Title: Solapur Zilla Parishad distributed 100 bicycles for the girls of villages to come to school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.