सोलापूर जिल्हा परिषद कर्मचाºयांचे लाक्षणिक उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:28 PM2019-08-09T12:28:21+5:302019-08-09T12:54:09+5:30
राज्य पातळीवर मागण्यांची पुर्तता होत नसल्याने कर्मचाºयांनी शासनाविरोधात व्यक्त केला संताप
सोलापूर : जिल्हा परिषद अंतर्गत काम करणारे विविध संवर्गाच्या राज्य पातळीवर अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर शासन पातळीवरुन हेतुत : दुर्लक्षित व उदासिनपणाची भावना दाखवित असल्याने संघटना पदाधिकारी यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषणास सकाळी सुरूवात केली.
जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाºया विविध संवर्गीय कर्मचाºयांच्या अनेक समस्या अनेक महिन्यांपासून राज्य पातळीवर विविध प्रकारची निवेदने व प्रत्यक्ष विविध पातळीवर संबंधीतावर चर्चा होवून देखील मागण्यांची पुर्तता होत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव ९ आॅगष्ट २०१९ रोजी क्रांतीदिनी एक दिवसाचे संघटना पदाधिकाºयांनी प्राथमिक स्वरुपाचे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.
या आंदोलनात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनिअनचे अध्यक्ष प्रभाकर कस्तुरे, सचिव राजीव गाडेकर, राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, कार्याध्यक्ष पी. जी. राऊत आदी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
- या आहेत उपोषणकर्त्यांच्या मागण्या...
- - ७ वा वेतन आयोगातील खंड २ अहवालातील वेतन त्रुटी लिपीक लेखा, परिचर, वाहनचालक आरोग्य, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आरेखक व इतर संवर्गातील त्रुटी दुर करणे.
- - जुनी पेन्शन योजना लागू करणे.
- - महाराष्ट्र विकास सेवा पदोन्नतीमध्ये कोटा वाढविणे.
- - अनुकंपा तत्वावरील नियुकती मधील टक्केवारी अट रद्द करून त्वरित शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्ती द्यावी.
- - शासकीय कर्मचाºयांप्रमाणे संगणक घरबांधणी अग्रीम मंजूर करणे़
- - वाहनचालक व परिचर यांना पाच हजार गणवेश अनुदान देणे.
- - व्यपगत पदे पुर्नजिवित करणे.
- - प्रशासन अधिकारी वर्ग २ चे पद तयार करणे.
- - वैद्यकिय तपासणी दाखले परिपत्रक रदद करणे.
- - अपील व वर्तणुक नियम सुधारीत करणे.
- - चौकीदार पदे निर्माण करणे.
- - प्राथमिक आरोग्य केंद व गटशिक्षणाधिकारी स्तरावर वरिष्ठ सहायक पदे निर्माण करणे.
- - गुणवंत कर्मचाºयांना आगाऊ वेतनवाढ मंजूर करणे.
- - कंत्राटी कर्मचाºयांना कायम करणे.