मोठी बातमी! सोलापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव निलंबित
By Appasaheb.patil | Published: December 26, 2022 02:26 PM2022-12-26T14:26:26+5:302022-12-26T14:26:48+5:30
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची विधान परिषदेत घोषणा करण्यात आली आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नागपूर येथील अधिवेशनात केली.
सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची विधान परिषदेत घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यात लोकसंख्या व अंतराच्या निकषानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यांची किती आवश्यकता आहे. याचा परिपूर्ण आराखडा सादर न केल्यामुळे निलंबीत करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. शासन स्तरावरील प्रशासनाकडून वारंवार पत्र देऊन प्रस्ताव मागवून देखील प्रस्ताव सादर न केल्यामुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
डॉ़ शितलकुमार जाधव हे सोलापूर येथे सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कृष्ठरोग) येथे कार्यरत होते, मात्र कोरोनाच्या काळात त्यांच्याकडे सोलापूर शहर आरोग्य अधिकारीपदाची सुत्रे देण्यात आली होती़ दरम्यान, त्यांनी केलेल्या विनंतीनुसार सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी पदी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा शासन निर्णय २९ सप्टेंबर २०२० रोजी प्राप्त झाला होता. त्यानुसार ते आजपर्यंत काम पाहत होते.