सोलापूर जिल्हा परिषदेतील शिपायाला 'कोरोना'ची लागण; आरोग्य विभागाचे टेन्शन वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 09:34 AM2020-06-04T09:34:05+5:302020-06-04T09:35:33+5:30
सोलापुरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील शिपायाला कोरोनाची बाधा झाल्याचे गुरुवारी आढळल्याने आरोग्य विभागाचे टेन्शन वाढले आहे.
जिल्हा प्रशासनाने सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेकडून आलेले अहवाल गुरुवारी सकाळी जाहीर केले आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेतील शिपाई पॉझिटिव्ह आढळला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी गेल्या आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी जिल्हा परिषदेत आले होते. त्या अधिकाऱ्यांसमवेत बांधकाम विभागातील एक अधिकारी आला होता. त्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे नंतर स्पष्ट झाले होते.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसह अकरा जणांचे स्वाप घेण्यात आले होते. त्यामध्ये फक्त शिपाई पॉझिटिव आढळला आहे तर इतर अधिकारी निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हा आरोग्य विभागाची चिंता मिटली आहे. मात्र शिपाई पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे.
गेल्या चार दिवसात हा शिपाई कोठे कोठे फिरला त्याचा शोध घेऊन संबंधितांची आता तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत हा विषय चर्चेचा झाला आहे. सकाळच्या अहवालात जिल्ह्यातील काही रुग्ण आढळल्याचे सांगण्यात आले.