सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक देणार आज ब्लेझरची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:37 AM2018-11-19T10:37:30+5:302018-11-19T10:40:12+5:30
सोलापूर : झेडपीच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना सोमवार दिनांक १९ रोजी सकाळी शाळेत प्रार्थनेच्या वेळी ब्लेझरची परीक्षा द्यावी लागणार आहे. ...
सोलापूर : झेडपीच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना सोमवार दिनांक १९ रोजी सकाळी शाळेत प्रार्थनेच्या वेळी ब्लेझरची परीक्षा द्यावी लागणार आहे.
झेडपीच्या प्रशासनाने शिक्षकांना स्थानिक ड्रेसकोडबरोबर ब्लेझर घालण्याची सक्ती आजपासून केली आहे. शाळेत प्रार्थनेच्या वेळी व परिपाठ सुरू असताना शिक्षक ब्लेझर वर आहेत की नाही हे पाहण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे, हे पक्के शाळेत जाऊन प्रार्थना व परिपाठाच्या वेळी किती शिक्षक ब्लेझरवर आहेत, कोणी या नियमांचे उल्लंघन केल्याची नोंद घेणार आहेत.
जे शिक्षक घालणार नाहीत त्यांच्याबाबतचा अहवाल शिक्षण विभाग भरती सीईओंकडे पाठवणार आहे, अशा शिक्षकांच्या सेवा पुस्तकावर लाल शेºयाने नोंद घेतली जाणार आहे. ब्लेझर्सला शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. याचा शिक्षकांवर कसा प्रभाव पडतो, हे पाहणे महत्त्वाचे होणार आहे व पदाधिकारी शाळांना भेटी देणार आहेत.