सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ड्रेसकोड बंधनकारक अन्यथा पगार नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 10:49 AM2018-10-05T10:49:09+5:302018-10-05T10:50:16+5:30

राजेंद्र भारुड यांचा इशारा : १५ आॅक्टोबरनंतर होणार अंमलबजावणी

Solapur Zilla Parishad teachers do not pay bogus dresses otherwise! | सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ड्रेसकोड बंधनकारक अन्यथा पगार नाही !

सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ड्रेसकोड बंधनकारक अन्यथा पगार नाही !

Next
ठळक मुद्देड्रेसकोडला विरोध करणाºया शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांवरही शिस्तभंगाची कारवाईड्रेसकोडचा रंग ठरविण्याबाबत संघटनांच्या प्रतिनिधींना पत्रपरिपत्रक काढून अंमलबजावणीची तारीख घोषित केली जाणार

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना १५ आॅक्टोबरनंतर ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे. जे शिक्षक ठरलेला ड्रेसकोड न घालता शाळेवर येतील त्यांना आॅक्टोबर महिन्यापासून पगार मिळणार नाही असा इशारा सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी  दिला. 

झेडपी शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय सभेने घेतला आहे. ड्रेसकोडला शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. तरीही सभेत ठरल्याप्रमाणे शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना ड्रेसचा रंग ठरविण्याबाबत पत्र दिले. पण संघटनांनी याला प्रतिसाद दिला नाही. जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे १६ संघटनांच्या अध्यक्षांनी ४ आॅक्टोबर रोजी झेडपीचे अध्यक्ष व सीईओंना निवेदन देऊन ड्रेसकोडची सक्ती करू नये म्हणून निवेदन दिले. यावर प्रतिक्रिया देताना सीईओ भारुड यांनी हा सभेने घेतलेला निर्णय आहे, तो सर्वांना मान्य करावाच लागेल.

प्रशासन म्हणून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची माझी जबाबदारी आहे. ड्रेसकोडमुळे शाळांना शिस्त येते. अनेक खासगी शाळांमध्ये ड्रेसकोडची अंमलबजावणी केली जाते. ड्रेसकोडला कोणत्याही शिक्षकांचा विरोध नाही. सर्व कर्मचारी, अधिकारी ड्रेसकोडमध्ये असतात. त्यामुळे हा निर्णय सर्वांना मानावाच लागेल असे डॉ. भारुड यांनी स्पष्ट केले. 

ड्रेसकोडचा रंग ठरविण्याबाबत संघटनांच्या प्रतिनिधींना पत्र दिले होते. पण त्यांनी प्रतिसाद न दिल्याने आता हा निर्णय शिक्षण समितीवर सोपविला आहे. शुक्रवारी स्थायी समितीची बैठक आहे किंवा शिक्षण समितीने बैठक घेऊन १0 आॅक्टोबरपर्यंत निर्णय द्यावा. अन्यथा यापूर्वी जो ड्रेसकोड ठरविला होता त्याची अंमलबजावणी केली जाईल. गणवेश शिक्षकांनी स्वत: खरेदी करावयाचा आहे व यासाठी ७ दिवसांची मुदत दिली जाणार आहे. याबाबत परिपत्रक काढून अंमलबजावणीची तारीख घोषित केली जाणार आहे. 
या तारखेनंतर जे शिक्षक गणवेशाविना येतील त्यांचा पगार काढला जाणार नाही. गणवेशात हजर राहणाºया शिक्षकांबाबत मुख्याध्यापकांकडून अहवाल घेतला जाणार आहे. 


अन्यथा पदाधिकाºयांवर कारवाई

आता यापुढे ड्रेसकोडला विरोध करणाºया शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांवरही शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशारा डॉ. भारुड यांनी दिला आहे. शिक्षक संघटनेचे पदाधिकारी नोकरी करतात. गणवेश हा शाळेच्या शिस्तीचा भाग आहे. त्यामुळे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयास विरोध करणे म्हणजे शिस्तभंग करण्यासारखे आहे. 

झेडपी अध्यक्ष म्हणाले चर्चा करू
च्झेडपी अध्यक्ष संजय शिंदे यांना ड्रेसकोडला विरोध असल्याबाबत विचारले असता, शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करू असे सांगितले. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी निधी उपलब्ध नसल्याबाबत सांगितले आहे, या प्रश्नाला उत्तर देताना सुभाष माने यांनी गणवेश शिक्षकांनी घ्यायचा आहे. त्यामुळे झेडपीच्या निधीची आवश्यकता काय असे म्हटले आहे. मी स्वत: ३५ वर्षे गणवेशात काढली आहेत. शाळांमध्ये शिस्त महत्त्वाची आहे. खासगी शाळांमधील शिक्षकांना दहा हजार पगार असतो पण ते गणवेशातच येतात. 

Web Title: Solapur Zilla Parishad teachers do not pay bogus dresses otherwise!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.