जिल्हा परिषदेचे 44 कोटी 94 लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यास सुरुवात
By शीतलकुमार कांबळे | Published: March 13, 2023 03:18 PM2023-03-13T15:18:04+5:302023-03-13T15:18:38+5:30
अंदाजपत्रक तयार करीत असताना उपस्थित सर्व खाते प्रमुख यांनी केलेल्या सुचना शिफारशींचा विचार करुन आणि ग्रामीण भागातील जनतेला न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून हा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने अंदाजपत्रक सादर करीत असल्याचे कोहिनकर यांनी सांगितले.
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे 44 कोटी 94 लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यास सुरुवात झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर हे अंदाजपत्रक सादर करत आहेत.
सन २०२२-२३ चे मूळ अंदाजपत्रक रक्कम रु.४१८८.११ लक्षचे आहे. सन २०२३-२४ च्या मूळ अंदाजपत्रकात रक्कम रु.३०३.८६ लक्ष इतकी वाढ करुन रक्कम रु.४४९४.९७ लक्षचे अंदाजपत्रक सादर करण्यात येत आहे.
अंदाजपत्रक तयार करीत असताना उपस्थित सर्व खाते प्रमुख यांनी केलेल्या सुचना शिफारशींचा विचार करुन आणि ग्रामीण भागातील जनतेला न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून हा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने अंदाजपत्रक सादर करीत असल्याचे कोहिनकर यांनी सांगितले.
या अर्थसंकल्पात सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दर्जा वाढावा, जिल्हा परिषदेचे आर्थिक सशक्तीकरण व्हावे तसेच शेतीसोबत जोडधंद्याना प्रोत्साहन मिळावे व ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावे यासाठी नाविन्यपूर्ण योजना अंतर्भूत केल्याचे कोहिनकर यांनी सांगितले.