खर्चाच्या माहितीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या पक्षनेत्यालाही मोजावे लागणार सहा हजार रुपये !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:12 PM2018-12-04T12:12:39+5:302018-12-04T12:14:48+5:30
अधिकाºयाकडून प्रथम टाळाटाळ : सचिवाकडून केला ‘आरटीआय’ अर्ज
सोलापूर : आषाढी यात्रेत झेडपीच्या पाणीपुरवठा विभागाने केलेल्या खर्चाबाबत पक्षनेते आनंद तानवडे यांनी अधिकाºयांकडे माहिती मागविली; पण ती देण्यास टाळाटाळ केल्यानंतर तानवडे यांनी आपल्या सचिवामार्फत माहिती अधिकाराखाली अर्ज केला. या अर्जानुसार माहिती देण्यासाठी अधिकाºयाने झेरॉक्सचा खर्च म्हणून सहा हजार रूपयांची मागणी केली. तानवडे यांनी हा खर्च देण्याची आता तयारी दर्शविली आहे.
आषाढी यात्रेत झेडपीच्या पाणीपुरवठा विभागाने केलेल्या खर्चाबाबत पक्षनेते आनंद तानवडे यांनी माहिती मागूनही अधिकाºयांनी दिली नाही म्हणून सचिवाने माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीला झेरॉक्सचा खर्च सहा हजार रुपये सांगण्यात आला आहे.
आषाढी यात्रेवेळी झेडपीच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे पालखी मार्गावरील स्वच्छता व पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाते. यासाठी दरवर्षी शासनाकडून काही निधी दिला जातो. हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयास मिळतो. त्याप्रमाणे जी कार्यालये पालखी मार्गावरील व्यवस्थेचे नियोजन करतात त्या कार्यालयांना या निधीचे वितरण होते.
झेडपीच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे पालखी मार्गावर पाणीपुरवठा, वारकºयांनी फिरते शौचालय, स्वच्छतेसाठी झाडू, हातमोजे, टी शर्ट, मास्क आणि कचरा संकलनासाठी खर्च करण्यात आला. यात्रा संपल्यावर पक्षनेते आनंद तानवडे यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे यांना पत्र देऊन माहिती मागविली. पण त्यांनी शासनाकडून मिळणाºया निधीबाबत माहिती निरंक म्हणून उत्तर दिले. त्यानंतर सदस्य अरुण तोडकर यांनीही या खर्चाबाबत माहिती देण्याबाबत पत्र दिले. पण दोन महिन्यांत या पत्राला उत्तर आले नाही.
खर्चाची माहिती घेण्यासाठी पक्षनेते आनंद तानवडे यांनी सचिव सूर्यकांत कोरे यांना माहितीच्या अधिकाराचे पत्र देण्याबाबत सूचना केली. त्यानुसार कोरे यांनी माहिती मागितली. त्यावर पाणीपुरवठा विभागाने आषाढी वारी काळात झेडपीने केलेल्या नियोजन व खर्चाबाबतची सर्व तपशीलवार माहिती देण्यासाठी संबंधित कागदपत्रांचे झेरॉक्स काढण्यासाठी आलेला सहा हजारांचा खर्च मागितला.
त्यानंतर हा खर्च कोणी भरायचा यावरून तानवडे व तोडकर यांच्याकडून माहिती घेण्यात आलेली नाही. पण प्रशासनाने टाळाटाळ केल्यामुळे या खर्चाबाबत काहीतरी गडबडी असल्याचा सुगावा पदाधिकाºयांना लागला आहे. त्यामुळे या खर्चाबाबत बाहेरून माहिती घेतली जात आहे. आता प्रशासनाकडून कोणती माहिती मिळणार आहे याचा पंचनामा करण्यासाठी मोठी तयारी करण्यात येत आहे.
आषाढी यात्रेत पाणीपुरवठा व स्वच्छतेबाबत झेडपी प्रशासनाने केलेल्या उपाययोजना व शासन निधीबाबत माहिती देण्याचे पत्र दिले होते. पण संबंधित विभागाने माहिती न दिल्याने माहिती अधिकाराचा वापर केला आहे. योग्य वेळ आल्यावर यावर बोलेन.
-आनंद तानवडे, पक्षनेते झेडपी