सोलापूर झेडपीच्या CEO मनिषा आव्हाळे, मनपा आयुक्त शीतल तेली - उगलेंनी रांगेत उभारून केलं मतदान
By Appasaheb.patil | Updated: May 7, 2024 11:36 IST2024-05-07T11:36:10+5:302024-05-07T11:36:37+5:30
मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या असून दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रांगेत उभारून आपला मतदानाचा हक्क बजावला.

सोलापूर झेडपीच्या CEO मनिषा आव्हाळे, मनपा आयुक्त शीतल तेली - उगलेंनी रांगेत उभारून केलं मतदान
सोलापूर : सोलापूर लोकसभेसाठी आज मतदान होत असून सकाळपासूनच आज प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे. सोलापूर लोकसभेसाठी पंधरा टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पतीसह लिटल फ्लॉवर स्कूल मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. तर महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांनी सेंट जोसेफ हायस्कूल या ठिकाणी आपले मतदानाचे हक्क बजावले. मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या असून दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रांगेत उभारून आपला मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा व सर्वांनी मतदान करा असे आवाहनही केले.