सोलापुरी दिवाळी ; सोलापुरी पणत्यांचा अमेरिकेत उजेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:13 PM2018-10-29T12:13:52+5:302018-10-29T12:15:10+5:30
सोलापूर : सोलापुरी चादर, कपडे, शेंगा चटणी, भाकर अशा अनेक वस्तुंनी केवळ प्रांतांच्या सीमाच ओलांडल्या नव्हे तर सातासमुद्रापारही गेल्या ...
सोलापूर : सोलापुरी चादर, कपडे, शेंगा चटणी, भाकर अशा अनेक वस्तुंनी केवळ प्रांतांच्या सीमाच ओलांडल्या नव्हे तर सातासमुद्रापारही गेल्या आहेत़ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरगुती फराळ-वस्तू बनविणाºया महिलांच्या काही वस्तू परदेशात दाखल झाल्या आहेत़ सोलापूर महिला उद्योजक संघटनेने गृहिणींच्या कौशल्याला संधी मिळवून देताच त्यांनी तयार केलेल्या पणत्या आणि आकाशदिवे या वस्तू अमेरिके त दाखल झाल्या आहेत.
या प्रदर्शनात स्टॉल लावणाºया काही सुग्रणी अमेरिकेतील आपल्या काही नातेवाईकांना मिठाई पाठवत होत्या़ काही वर्षांनंतर अमेरिकनवासीय सोलापूरकरांनी मिठाईबरोबरच आकाशदिवे, पणत्याही मागविण्यास सुरूवात केली. अमेरिकेत भारतीयांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी तेथे दिवाळीची बाजारपेठ दरवर्षी भरते; पण त्या वस्तू तेथील भारतीय व्यापाºयांनी अमेरिकेतच तयार केलेल्या असतात. अस्सल भारतीय आणि सोलापुरी वस्तूं हजारो किलो मिटर्स दूर राहून उपयोगात आणता याव्यात, या उद्देशाने आमच्या वस्तूंची विशेषत: आकाश दिवे आणि पणत्यांची खरेदी केली जाते, असे सोलापूर महिला उद्योजक संघटनेच्या पृथा हलसगीकर यांनी सांगितले.
या संघटनेच्या वतीने सारस्वत मंगल कार्यालयात एक दिवसीय ‘दीपोत्सव’ प्रदर्शनात फराळाचे विविध पदार्थ आणि दिवाळी साहित्यांचे २५ स्टॉल लागले़ शहरातील विविध ठिकाणच्या महिलांनी फराळाचे विविध पदार्थ, फटाके, पूजेचे साहित्य, आकाशदिवे, पणत्या, सुगंधी तेल आणि उटण्याचे साहित्य वैगरे स्टॉलवर लावले़ फराळाशिवाय महिलांसाठी कानातील, गळ्यातील शृंगार साहित्यही या स्टॉलमध्ये पाहायला मिळताहेत. घरगुती महिलांना चालना देणाºया या उपक्रमासाठी मेघना करवंदे, प्रांजली लागू, भारती देशक, अश्लेषा निपुणगे, मानसी कुलकर्णी, संजय कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले़
अस्सल अन् हँडमेड वस्तू
च्या प्रदर्शनात स्टॉलवर लागलेल्या वस्तूंमध्ये अस्सल सोलापुरीपणा दिसून आला. ज्यूट आणि टोपलीपासून बनविलेले आकाशदिवे साºयांनाच खुणावताहेत. याबरोबरच प्लास्टिकच्या पणत्या, जेल पणत्या, रिफ्लेक्शन अशा विविध घरगुती पणत्या पाहायला मिळाल्या़ अंगावर ओरखडे ओडले जाऊ नये म्हणून उटण्याचे विशेष साबणही पाहायला मिळाले़