सोलापुरी शड्डू ; शालेय विद्यार्थ्यांना पैलवानकीचे डावपेच शिकविणारा भगवा आखाडा 

By appasaheb.patil | Published: November 29, 2018 12:47 PM2018-11-29T12:47:02+5:302018-11-29T12:48:24+5:30

आप्पासाहेब पाटील ।  सोलापूर : विद्यार्थी म्हटलं की शाळा, अभ्यास, दंगामस्ती, मोबाईलवरील गेम खेळणे आदी आलेच़ अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ...

Solapuri Shaddu; Saffron outlet teaching pedagogical strategies for school students | सोलापुरी शड्डू ; शालेय विद्यार्थ्यांना पैलवानकीचे डावपेच शिकविणारा भगवा आखाडा 

सोलापुरी शड्डू ; शालेय विद्यार्थ्यांना पैलवानकीचे डावपेच शिकविणारा भगवा आखाडा 

Next
ठळक मुद्देसोलापूरच्या मध्यवर्ती भागात कै. रेवप्पाअण्णा परळकर यांनी १९७१ साली भगवा आखाडा, गवळी तालमीची स्थापना शेकडो शाळकरी विद्यार्थी शरीर पिळदार करण्यासाठी लालमातीत सकाळ-संध्याकाळ व्यायाम करीत पैलवानकीचे डावपेच शिकतातसिद्धेश्वर केसरी स्पर्धेचा मान भगवा आखाड्याला

आप्पासाहेब पाटील । 

सोलापूर : विद्यार्थी म्हटलं की शाळा, अभ्यास, दंगामस्ती, मोबाईलवरील गेम खेळणे आदी आलेच़ अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शहरं डिजिटल होऊ लागली़ मात्र, या सोलापूरसारख्या स्मार्ट शहरात शेकडो पैलवान घडविणाºया भगवा आखाडा गवळी वस्ती तालमीचे काम वाखाणण्याजोगे आहे़ या तालमीत आजही शेकडो शाळकरी विद्यार्थी शरीर पिळदार करण्यासाठी लालमातीत सकाळ-संध्याकाळ व्यायाम करीत पैलवानकीचे डावपेच शिकतात.

नवीपेठ परिसरात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयासमोर एका छोट्याशा जागेत सोलापुरातील पैलवानकीची परंपरा टिकण्यासाठी सोलापूरच्या मध्यवर्ती भागात कै. रेवप्पाअण्णा परळकर यांनी १९७१ साली भगवा आखाडा, गवळी तालमीची स्थापना केली.

शहरातील सर्व तालमींचे प्रमुख या तालमीला केंद्रबिंदू मानतात. १९७१ सालच्या काळात कै. गंगाराम परळकर, कै. गोविंद नाईकवाडे, कै. बाबा परळकर, कै. गुंडाप्पा कोरे, कै. प्रभाकर परळकर, कै. मारुती परळकर आदींनी सोलापुरात कुस्तीपटू घडविण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते़ त्यावेळी कै. तुकाराम लकडे (बुवा) यांनी वस्ताद म्हणून यशस्वी भूमिका बजावली होती.

दरम्यान, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जिममधील यंत्रसामुग्रीने युवकांचे लक्ष वेधले. मात्र, भगवा आखाड्यातील भरत मेकाले, राजू परळकर, सिद्धेश्वर परळकर, अमर दुधाळ, सावळाराम कोलारकर, सतीश कोलारकर, सचिन खुर्द, नितीन खुर्द, प्रभाकर काशिद, अमोल काशिद, शिवाजी परळकर, अभिजित दुधाळ, आप्पा कोरे, अमोगसिद्ध चुंगीविडिया यांनी लालमातीतील कुस्तीला वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले व आजही ते करीत आहेत़ सध्या दशरथ मिसाळ हे वस्तादाची भूमिका पार पाडत आहेत़ या तालमीतील भरत मेकाले यांनी उपमहाराष्ट्र केसरीचा मान मिळविला आहे़ याशिवाय अमोल काशिद, सचिन खुर्द, नितीन खुर्द, गोपीनाथ घोडके, आतिश मोरे यांनी विविध पातळीवर यश मिळवून तालमीचे नाव महाराष्ट्रभर केले आहे.

या तालमीत शाळकरी मुलांची संख्या अधिक आहे़ नियमितपणे शेकडो मुले व्यायाम करण्यासाठी सकाळ-संध्याकाळी येतात़ आगामी काळात तालमीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी पाच मजली इमारतीबरोबर सर्वसेवासुविधा पुरविण्यावर आमचा भर असणार आहे़ सर्वाधिक व्यायाम करणारी तालीम म्हणून भगवा आखाडा, गवळी तालमीचा नावलौकिक आहे़
- राजू परळकर, अध्यक्ष, भगवा आखाडा, गवळी तालीम

सिद्धेश्वर केसरी स्पर्धेचा मान भगवा आखाड्याला
- जानेवारी महिन्यात सोलापूर शहरातील सिद्धेश्वर आखाड्यात सिद्धेश्वर केसरी स्पर्धा भरविण्यात येतात. या स्पर्धेत राज्यभरातून पैलवान सोलापूरला येतात़ मागील कित्येक वर्षांपासून या स्पर्धेचा मान भगवा आखाडा, गवळी तालमीला आहे़ आजपर्यंत या तालमीला अभिजित खटके, अमोल पुचडे, विकी बनकर, काका पवार यांच्यासह अन्य महाराष्ट्र केसरीपटूंनी भेटी दिलेल्या आहेत़ 

Web Title: Solapuri Shaddu; Saffron outlet teaching pedagogical strategies for school students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.