तेलंगणात सोलापुरी टेक्स्टाईल युनिट; टेक्स्टाईल पार्क उभारण्यासाठी हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 10:31 AM2020-02-06T10:31:28+5:302020-02-06T10:33:19+5:30

तेलंगणा सरकारकडून सोलापूरच्या उद्योजकांचे कौतुक; चादर अन् टेरी टॉवेलचे उत्पादन वाढले

Solapuri Textile Unit in Telangana; Movements to set up a textile park | तेलंगणात सोलापुरी टेक्स्टाईल युनिट; टेक्स्टाईल पार्क उभारण्यासाठी हालचाली

तेलंगणात सोलापुरी टेक्स्टाईल युनिट; टेक्स्टाईल पार्क उभारण्यासाठी हालचाली

Next
ठळक मुद्देतेलंगणात चादर आणि टेरी टॉवेल्सचे युनिट यापूर्वी नव्हतेसोलापूरकरांनी येथे पहिल्यांदा सोलापुरी टेरी टॉवेल्सचे युनिट सुरु केले तेलंगणा राज्यात टॉवेल्स आणि चादरींना मार्केट आहे

सोलापूर : सोलापुरातील काही उद्योजकांनी तेलंगणात टेक्स्टाईलचे एक युनिट सुरु केले आहे़ सोळा जेकार्ड यंत्रमाग असलेल्या या टेक्स्टाईल युनिटमध्ये सोलापुरी चादर आणि टेरी टॉवेलचे उत्पादन होत आहे़ सोलापुरी चादरी आणि टेरी टॉवेल्सची विक्री तेलंगणाच्या विविध बाजारात होत आहे़ यास तेथील ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे़ विशेष म्हणजे, सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योजकांना तेलंगणा सरकार अर्थात केसीआर सरकारकडून ब्रतुकम्मा साड्यांची आॅर्डर मिळत आहे.

सोलापुरी टेक्स्टाईलचे कौशल्या पाहून तेलंगणा सरकार सोलापूरच्या उद्योजकांना एक मोठे नवीन टेक्स्टाईल पार्क सुुरु करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे़ वरंगल जिल्ह्यातील रामपूर गाव परिसरात मणिकोंडा इंडस्ट्रीज एरियामध्ये सोलापुरी टेक्स्टाईल युनिट सुरु आहे़ गेल्या दोन वर्षांपासून हे युनिट कार्यरत आहे़ येथे सोलापुरातील कुशल कामगार काम करत आहेत़ प्रतिवर्षी सव्वा लाखाहून अधिक टेरी टॉवेल, चादरी आणि वीस हजारांहून अधिक ब्रतुकम्मा साड्यांचे उत्पादन या युनिटमधून होतेय.

सोलापूर-तेलंगणा मायग्रेट पॉवरलूम टेक्स्टाईल विवर्स अ‍ॅन्ड मॅन्युफॅक्चर्स वेल्फेअर असोसिएशन अंतर्गत हे युनिट सुरु आहे़ दर्गा स्वामी हे या असोसिएशनचे अध्यक्ष असून, मनोहर सिंगम हे सचिव आहेत़ खजिनदार राजेशम चिलका, उपाध्यक्ष आनंद अरकाल, उपसचिव आनंद निली, सहखजिनदार देविदास इट्टम यांच्या देखरेखीत युनिट सुरु आहे.

टेक्स्टाईलच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून दखल
- दोन वर्षांपूर्वी रामपूर येथे सोलापुरी टेक्स्टाईल युनिट सुरु झाल्यानंतर तेलंगणा सरकारच्या टेक्स्टाईल विभागातील वरिष्ठ अधिकारी शैलजा रमिया यांनी युनिटला भेट दिली़ त्यांनी सोलापुरी चादर, जेकार्ड टॉवेल्सची पाहणी केली़ त्यानंतर त्यांनी सोलापुरी कलाकौशल्याचे मनापासून कौतुक केले़ विशेष म्हणजे, केसीआर सरकारमधील वजनदार आमदार शेखर नायक, तेलंगणा स्टेट इंडस्ट्रीज इन्फ्रास्ट्रक्चर कापर््ॅोरेशनचे अध्यक्ष जी़ बालमल्लू, एम़डी़ नरसिम्हा रेड्डी तसेच सीईओ मधूसुदन राव यांनीदेखील या युनिटची पाहणी केली़ त्यानंतर त्यांनी सोलापुरी युनिटबद्दलची बातमी मुख्यमंत्री केसीआर यांच्या कानी पोहचोवली़ केसीआर यांनी सोलापुरी युनिटला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले़ त्यानंतर केसीआर सरकारच्या मदतीने दुसरे मोठे टेक्स्टाईल पार्क जंगम जिल्ह्यातील कल्यम या गावी सुरु होणार आहे़ त्याची तयारी सुरु आहे़

तेलंगणात चादर आणि टेरी टॉवेल्सचे युनिट यापूर्वी नव्हते़ सोलापूरकरांनी येथे पहिल्यांदा सोलापुरी टेरी टॉवेल्सचे युनिट सुरु केले़ याचे अप्रूप तेथील सरकारला आहे़ तेलंगणा सरकारकडून आम्हाला खूप चांगल्या सोयीसुविधा मिळत आहेत़ त्यामुळे तेथे आम्हाला उत्पादन घेणे शक्य होत आहे़ तेलंगणा राज्यात टॉवेल्स आणि चादरींना मार्केट आहे़ भविष्यात केसीआर सरकारच्या मदतीने मोठे टेक्स्टाईल पार्क सुरु करणार आहोत़
- मनोहर सिंगम,
सचिव, सोलापूर-तेलंगणा मायग्रेट पॉवरलूम टेक्स्टाईल विवर्स अ‍ॅन्ड मॅन्युफॅक्चर्स वेल्फेअर असोसिएशऩ

Web Title: Solapuri Textile Unit in Telangana; Movements to set up a textile park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.