coronavirus; सोलापूरकरांनो घराबाहेर पडू नका...स्वत:ची काळजी घ्या...भिती बाळगू नका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 12:05 PM2020-03-23T12:05:39+5:302020-03-23T12:08:20+5:30

सोलापुरातील अधिकाºयांसह डॉक्टरांनी केले आवाहन; सोलापूर शहर व जिल्ह्यात जमावबंदी लागू

Solapuris don't go out of the house ... take care of yourself ... don't be afraid ... | coronavirus; सोलापूरकरांनो घराबाहेर पडू नका...स्वत:ची काळजी घ्या...भिती बाळगू नका...

coronavirus; सोलापूरकरांनो घराबाहेर पडू नका...स्वत:ची काळजी घ्या...भिती बाळगू नका...

googlenewsNext
ठळक मुद्दे- कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी जागरूकता दाखविण्याची गरज- मनपाच्या अत्यावश्यक यंत्रणा सेवेत आहेत. बंदच्या काळात कोणत्याही सेवेत खंड नाही- सोलापूरकरांनी शासनाने व पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

सोलापूर : जनता कर्फ्युत नागरिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी जी जागरूकता दाखविली ती अशीच कायम राहणे गरजेचे आहे. नागरिकांनी विषाणूची लागण होऊ नये म्हणून बाहेर न पडता स्वत:ची काळजी घ्यावी, यातून इतरांचेही संरक्षण होणार असल्याचे मत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले़

काळजी घ्यावी
जनता कर्फ्युत नागरिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी जी जागरूकता दाखविली ती अशीच कायम राहणे गरजेचे आहे. नागरिकांनी विषाणूची लागण होऊ नये म्हणून बाहेर न पडता स्वत:ची काळजी घ्यावी, यातून इतरांचेही संरक्षण होणार आहे. 
- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी

चांगला प्रतिसाद द्यावा
रविवारी जनतेचा कर्फ्यू होता, तो १00 टक्के यशस्वी झाला. लोकांनी  चांगला प्रतिसाद दिला. यापुढे नगरपालिका व महानगरपालिकेच्या भागात १४४ कलम लागु केले आहे, यालाही नागरीकांनी चांगला प्रतिसाद द्यावा. स्वत:ची व इतरांची काळजी घ्यावी
- मनोज पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक

संक्रमण थांबविण्यासाठी ३१ मार्चपर्यंत सहकार्य करावे
जनतेच्या कर्फ्यूमध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, लोकांनी घरात राहून जागरुक नागरिकाची जबाबदारी पार पाडली. कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे, त्याची काळजी आणि सुरक्षा म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व बाजारपेठा, व्यवसाय पूर्णपणे बंद होता; मात्र हा व्हायरस पूर्णपणे थांबवायचा असेल तर शासनाच्या आदेशान्वये येथून पुढे ३१ मार्चपर्यंत नागरिकांनी असेच सहकार्य करावे. स्वत:बरोबर इतरांची काळजी घ्यावी. विनाकारण लोकांनी बाहेर पडू नये, जमाव जमवून शहरात सार्वजनिक ठिकाणी बसू नये. शासनाने व पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. 
- अंकुश शिंदे, 
पोलीस आयुक्त 

अत्यावश्यक सेवेत खंड पडल्यास
विभागीय कार्यालयांंना कळवा

मनपाच्या अत्यावश्यक यंत्रणा सेवेत आहेत. बंदच्या काळात कोणत्याही सेवेत खंड पडू दिला नाही. केगाव येथील अलगीकरण केंद्रात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आज दिवसभरात सर्व खोल्यांची स्वच्छता करून घेतली. आयडीएच येथील विलगीकरण कक्षात डॉक्टर आणि नर्स कार्यरत आहेत. रेल्वे स्टेशन, बसस्थानक या परिसरात हात धुण्यासाठी हॅँड वॉश स्टेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे. लोकांनी रविवारी स्वयंस्फूर्तीने रविवारच्या बंदमध्ये सहभाग घेतला. याबद्दल त्यांचे आभार मानायला हवेत. प्रशासकीय यंत्रणा आरोग्य, स्वच्छता या दोन्ही गोष्टींसाठी काम करीत आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. विनाकारण आपला जीव संकटात घालू नका. कायदा पाळा. मनपाच्या अत्यावश्यक सेवेत खंड पडत असेल तर विभागीय कार्यालयांना कळवा. तातडीने अडचणी दूर करण्यात येतील. 
- दीपक तावरे, आयुक्त, महापालिका. 

सिव्हिलच्या वॉर्डातील गर्दी विभागली जाईल, याकडे लक्ष
राज्यामध्ये पहिल्यांदा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण फ्लू (ताप) ओपीडी सुरू केली आहे. याचे अनुकरण इतर सरकारी रुग्णालये करत आहेत. या स्वतंत्र ओपीडीमुळे आजार पसरणार नाही. रुग्णांची सेवा चांगल्या पद्धतीने करता येईल. प्रत्येक रुग्णाकडे स्वतंत्रपणे लक्ष देता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका रुग्णाकडून दुसºया रुग्णाकडे आजार पसरणार नाही. एका ठिकाणी होणारी गर्दी विभागली जाईल. फक्त ताप, घसादुखी, सर्दी, खोकला या आजाराचे रुग्ण या फ्लू ओपीडीमध्ये जातील. कोरोना आजाराचा सामना करण्यासाठी डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय रुग्णालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय पूर्णपणे सज्ज आहे. एखादा रुग्ण आल्यास त्यावर उपचार कसे करायचे यासाठी मॉक ड्रील (प्रात्यक्षिक) घेण्यात आले. त्यांची तपासणी करणे, लक्षणाविषयी जाणून घेणे, ट्रॅव्हल हिस्ट्री विचारणे आदी काम करण्यात आले. गरज पडल्यास रुग्णाला आयसोलेशन वॉर्डमध्ये पाठविणे याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. रुग्णांवर उपचार क से करायचे याविषयीच्या सर्व सूचना डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांना देण्यात आल्या आहेत.
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, 
डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.

Web Title: Solapuris don't go out of the house ... take care of yourself ... don't be afraid ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.