सोलापूरकर म्हणतात; चांगल्या जेवणापेक्षा आधी औषधे मागवा अन् आमचा जीव वाचवा ओ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 01:36 PM2021-04-18T13:36:02+5:302021-04-18T13:36:30+5:30

मनपाच्या कोवीड सेंटरची स्थिती: रेमडेसिविरबरोबर ‘डेक्सा’ची मागणी वाढली

Solapurkar says; Order medicine before a good meal and save our life oh ...! | सोलापूरकर म्हणतात; चांगल्या जेवणापेक्षा आधी औषधे मागवा अन् आमचा जीव वाचवा ओ...!

सोलापूरकर म्हणतात; चांगल्या जेवणापेक्षा आधी औषधे मागवा अन् आमचा जीव वाचवा ओ...!

Next

सोलापूर: दहा रुपयाच्या डेक्सा या इंजेक्शनसाठी पाॅझिटिव्ह रुग्णांचा जीव टांगणीवर असल्याची गंभीर बाब सिंहगड कोविड सेंटरच्या डॉक्टरांच्या चिठ्ठीवरून उघड झाली आहे. ‘चांगल्या जेवणापेक्षा आधी औषधे मागवून आमचा जीव वाचवा’ असा आर्त टाहो रुग्णांनी फोडला आहे.


शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढेल तसे महापालिका प्रशासनाने कोविड सेंटरची संख्या वाढविली आहे. या कोविड सेंटरवर चाचणीत पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हलविले जातात व १४ दिवस त्यांना देखरेखीखाली ठेवले जाते. सिंहगड व पोलीस प्रशिक्षण केंद्रातील क्वारंटाईन सेंटर शहरापासून दूर आहेत. लक्षणे त्रीव असलेल्या रुग्णांच्या हातात ज्यावेळी तेथील डॉक्टर ही इंजेक्शन व औषधे आणा म्हणून चिठ्ठी देतात तेव्हा मात्र त्या रुग्णांचा जीव टांगणीला लागतो. महामार्गावर असलेल्या या क्वारंटाईन सेंटरवर दिवसा येणाऱ्यांना भीती वाटते. परिसरात दहा किलोमीटरवर औषधालये नाहीत. मग रुग्णांनी ही औषधे आणायची कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेने कोविड सेंटर सुरू करून जेवणखाण व राहण्याची उत्तम व्यवस्था केली; पण औषधाचे काय असा आता प्रश्न उपस्थित झाला आहे.

मनपा आरोग्य खात्याकडे औषधेच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती सेंटरवर नियुक्तीस असलेल्या डॉक्टरांनी दिली आहे. ‘रुग्णांकडून तुम्हीच ॲडजेस्ट करा’, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असल्याचेही सांगण्यात आले.

हे इंजेक्शन गरजेचे

चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांना दोन दिवसानंतर त्रीव लक्षणे दिसतात. ज्या रुग्णांचा खोकला थांबत नाही त्या रुग्णाला डेक्सा हे इंजेक्शन दिले जाते. हे इंजेक्नशन दिले गेले नाहीतर खोकल्याचा त्रास वाढून रुग्णांचे ॲाक्सिजन कमी होते व त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केल्याशिवाय पर्याय राहत नाही. दमा, खोकला थांबविण्यासाठी हे इंजेक्शन अत्यंत गरजेचे आहे. १०० रुग्णात २० जणांना याची गरज भासते. इंजेक्शन वेळेत उपलब्ध झाले नाही तर संबंधिताला हाॅस्पिटलकडे हलविण्याचा सल्ला दिला जातो. हॉस्पिटलमध्ये जसे रेमडेसीवर तसे कोविड सेंटरमध्ये डेक्सा हे इंजेक्शन गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.

नगरसेवकाने दिली औषधे

१५ एप्रिल रोजी १२ रुग्णांना डॉक्टराने हे इंजेक्शन व औषधे लिहून दिली. रुग्णांना ही औषधे आणायची कुठून हा प्रश्न पडला. एका रुग्णाने नगरसेवक सुरेश पाटील यांना ही चिठ्ठी पाठविली. त्यांनी या रुग्णांना औषधे उपलब्ध करून दिली व संबंधित डॉक्टरांना विचारणा केली. त्यावेळी औषधाचा साठा संपल्याचे सांगण्यात आले. जेवणापेक्षा औषधे महत्वाची आहेत व तात्काळ उपलब्ध करा अशी मागणी आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे करण्यात आली.

अधिकाऱ्यांची पळापळ सुरू

नगरसेवक पाटील यांनी औषधाच्या टंचाईने रुग्णांचे बरेवाईट झाल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल असे पत्र देताच पळापळ सुरू झाली. जिल्हा आरोग्य विभागाकडे औषधांची मागणी करण्यात आली. पण जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढल्याने नकार देण्यात आला. औषधाच्या साठ्याबाबत आरोग्य अधिकारी डॉ. दुधभाते, उप आयुक्त धनराज पांडे यांच्याकडे विचारणा केली पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही

Web Title: Solapurkar says; Order medicine before a good meal and save our life oh ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.