सोलापूरकरांनो; शनिवारीही खरेदी करता येईल किराणा माल अन् भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 01:45 PM2021-05-07T13:45:29+5:302021-05-07T13:45:35+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Solapurkars; Groceries and vegetables can also be purchased on Saturdays | सोलापूरकरांनो; शनिवारीही खरेदी करता येईल किराणा माल अन् भाजीपाला

सोलापूरकरांनो; शनिवारीही खरेदी करता येईल किराणा माल अन् भाजीपाला

Next

सोलापूर: जिल्ह्यात वाढलेला कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहर आणि जिल्ह्यात ८ ते १५ मे पर्यंत संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय  घेतला आहे. त्यामुळे शुक्रवारी सोलापुरात खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड उडाली. सोलापूरकरांनो काळजी करू नका कारण शनिवारीही भाजीपाला, किराणा दुकाने सुरू राहणार आहेत. 

जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता निर्बंध कडक करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापालिका आयुक्त पी.  शिवशंकर यांनी घेतला आहे. त्यामुळे आता सुरू असलेल्या आदेशानुसार सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू असलेल्या अत्यावश्यक सेवा देखील ८ ते १५ मेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत केवळ वैद्यकीय सेवा सुरू राहतील अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. 8 मे रात्री आठ पासून हा आदेश लागू होणार आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी सात ते अकरा या वेळेत किराणा दुकाने व भाजीपाला विक्री सुरूच राहणार आहे. त्यामुळे लोकांनी खरेदीबाबत चिंता करू नये, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. फिजिकल डिस्टन्स व मास्कचा वापर करून गर्दी न करता लोकांनी खरेदी उरकावी, असे सूचित करण्यात आले आहे.

काय सुरु, काय बंद?

रविवार पासून 15 मे पर्यंत किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्रेता आणि इतर अत्यावश्यक सेवेतील दुकाने देखील या आठवडाभरासाठी संपूर्णपणे बंद असतील. मात्र नागरिकांना अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी सवलतीसाठी उद्या 7 मे शुक्रवार आणि 8 मे, शनिवारी परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

ग्रामीण भागातही हाच आदेश लागू...

प्रशासनाने घोषित केलेल्या आदेशानुसार केवळ हॉस्पिटल, मेडिकल आणि वैद्यकीय सेवेशी निगडित अस्थापनाच या काळात सुरू राहणार आहेत. ग्रामीणभागाप्रमाणे शहरात देखील हेच आदेश लागू राहणार आहेत. दूध विक्री केवळ घरपोच करता येईल. तसेच लसीकरणसाठी जे नागरिक घराबाहेर पडतील त्यांच्याकडे नोंदणीचे मेसेज असणे गरजेचे असणार आहे. नोंदणी केलेल्या दिवशीच आणि त्याच वेळेत लसीकरणसाठी घराबाहेर पडता येईल. तसेच मेडिकल आणि वैद्यकीय सेवेशी निगडीत असलेल्यांनी आपल्या सोबत ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

Web Title: Solapurkars; Groceries and vegetables can also be purchased on Saturdays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.