सोलापूरकरांनो...यंदा मिरवणूका नाहीत...घरच्या घरी करा गणपतीचे मनोभावे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 09:23 PM2021-09-03T21:23:59+5:302021-09-03T21:25:57+5:30
सोलापूर महापालिकेत महापौर यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव संदर्भात बैठक
सोलापूर : आज सावित्रीबाई फुले सभागृह येथे महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी सभागृह नेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे , आयुक्त पि.शिवशंकर, गटनेते चेतन नरोटे, गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते रियाज खरादी, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर, महापालिका उपआयुक्त एन.के.पाटील, उपआयुक्त धनराज पांडे, साहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत, साहाय्यक आयुक्त श्रीराम पवार,नरसींग मेनगजी, माजी उपमहापौर दिलिप कोल्हे, दास शेळके यांच्यासह सर्व पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, महापालिका सर्व झोन अधिकारी तसेच सर्व गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व सोलापूरकरांना महानगरपालिकेकडून आव्हान करण्यात येत आहे. या वर्षी गणेशोत्सवासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केले आहेत. यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांना महापालिकेचे पूर्वपरवानगी घ्यावी लागेल, सार्वजनिक मंडळाची गणेश मूर्ती चार फूट तर घरगुती गणपती दोन फुटाचा असावा, गणपती आणताना विसर्जनासाठी मिरवणूक काढता येणार नाही, पण शकतो शाडूच्या मातीची मूर्ती स्थापन करावी आणि या मूर्ती घरच्या घरी विसर्जन कराव्यात. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करता आरोग्य विषयक उपक्रम सार्वजनिक मंडळाने राबवावी. यंदाच्या गणेश विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करावयाचा आहे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरातच गणपती विसर्जन करावे तसेच महानगरपालिकेने वॉर्डनिहाय, प्रभागनिय गणपतीची मूर्ती संकलित करून विसर्जन करण्याची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे, त्यामुळे कोणीही स्वतः जाऊन कुठल्याही ठिकाणी विसर्जन करू नये सर्वांनी एक तर तर आपल्या घरातच गणपती विसर्जन करावा किंवा जवळच्या महापालिकेने नेमून दिलेल्या ठिकाणी आणून द्यावा या ठिकाणाहून गणपतीची मूर्ती संकलित करून महानगरपालिकेच्या वतीने विसर्जन करण्यात येईल.
सदरच्या गणेश विसर्जनासाठी सोलापूर शहरातील अनेक एन.जी.ओ व मध्यवर्ती गणपती मंडळ, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने गणपती विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना संसर्गजन्य प्रादुर्भाव होणार नाही व थांबण्यास मदत होईल.