सोलापूरकरांनो.. काय आवडतं तुम्हाला ? पंचवीसचा मास्क की शंभर रुपयांचा दंड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 12:48 PM2020-10-01T12:48:01+5:302020-10-01T12:50:15+5:30
अधिकाºयांना दिले कारवाईचे टार्गेट; थुंकणाºयांना आता जागेवरच दंड
सोलापूर : महापालिकेच्या मुख्य आरोग्य निरीक्षकांनी दररोज पाच हजार तर आरोग्य निरीक्षकांनी दोन हजार रुपयांचा दंड प्रशासनाकडे जमा करावा. अन्यथा या अधिकाºयांवरच कारवाई होईल, असा इशारा उपायुक्त धनराज पांडे यांनी दिला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य निरीक्षकांनी मास्क न वापरणारे, रस्त्यावर थुंकणाºया नागरिकांवर शासन आदेशानुसार कारवाई करावी असे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले होते. अधिकाºयांनी आठ ते दहा दिवस मोहीम राबवली. त्यानंतर पावत्या पुस्तके कपाटात टाकून दिली.
उपायुक्त पांडे यांनी बुधवारी विभागीय अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक यांची बैठक घेतली. सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, रस्त्यावर थुंकणे, लघुशंका करणे, कचरा रस्त्यावर टाकणे यासंदर्भात अधिकाºयांनी कारवाई सुरू करावी. तरच शहरातील नागरिकांना शिस्त लागेल. शहरात धुळीचे प्रमाण वाढले आहे. सात दिवसांच्या आत माती हटवण्यात यावी. कामात कुचराई केल्यास अधिकाºयांवर कारवाई होईल, असा इशाराही देण्यात आला.
विनामास्क फिरणाºया दीडशे जणांवर कारवाई
- - कोरोनामुळे प्रशासनाच्या वतीने मास्क घालण्याचे सूचना देण्यात आले आहेत. पण, तरीही या सुचनेकडे दुर्लक्षकरणाºयांविरूध शहरात सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्यात आली. बुधवारी एकाच एकूण १५० जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाÞही कारवाई शहरातील सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.
- - ही मोहीम आसरा, पार्क चौक, छत्रपती शिवाजी चौक आदी ठिकाणी राबवण्यात आली. यात एकूण ६९५ वाहने तपासण्यात आली. यातील १३८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच विना मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा पालन न करणाºयांवर ही कारवाई करण्यात आली.
- - आतापर्यंत १७ आॅगस्टपासून ते ३० सप्टेंबरपर्यंत ७ हजार ४०९ जणांवर विनामास्कची कारवाई करण्यात आली तर या सर्वांकडून ७ लाख ४४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडताना मास्क घालूनच बाहेर पडावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जन्म दाखले दिलेच पाहिजेत
महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांमधून जन्म दाखले देण्यात यावेत, असे आदेश दिले आहेत; मात्र अनेक कार्यालयांमधून वेळेवर दाखले मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. शहरातील स्मशानभूमीत ज्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार झाले. त्यांची नोंद विभागीय कार्यालयांकडे जायला हवी. यात कुचराई करु नका. अन्यथा निलंबित व्हाल असा इशाराही पांडे यांनी दिला.
खरंच कारवाई होणार का?
शहरातील रस्त्यांवर कचरा वाढत आहे. हद्दवाढ भागात अनेक बेशिस्त नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. मनपा अधिकाºयांचे कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. आता उपायुक्त पांडे यांनी यासंदर्भात अधिकाºयांवर कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहरात खरोखरच कारवाई सुरू होते का? याकडे लक्ष आहे.