सोलापूरच्या केळीला अरब राष्ट्रांत मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 03:03 AM2018-01-25T03:03:12+5:302018-01-25T03:03:23+5:30
ज्वारीसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापुरातील केळीला अरब राष्ट्रांतून मागणी आहे.
संताजी शिंदे
सोलापूर : ज्वारीसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापुरातील केळीला अरब राष्ट्रांतून मागणी आहे. कंदर (ता. करमाळा) आणि अकलूज (ता. माळशिरस) येथून दर्जेदार केळी मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात आहेत. सोलापूर जिल्ह्यात ६ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड होते. एकरी ३० टन केळीचे उत्पादन होते. एकूण उत्पादनाच्या २० टक्के केळीची ओमान, जेद्दाह, सौदी अरब, अफगाणिस्तान आदी देशांत निर्यात केली जातात.
केळीला बाजारात मोठी मागणी असून, उत्पादनाच्या एकूण २० टक्के माल परदेशात निर्यात केला जातोे, असे जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी सांगितले.
रशिया आणि ग्रीस या देशातही जिल्ह्यातून केळी जातात. मात्र, वाहतुकीचा कालावधी लक्षात घेता, रशियासारख्या देशात मोठ्या प्रमाणात केळी निर्यात करता येत नाहीत. जलद वाहतुकीच्या दृष्टीने भविष्यात विमानाद्वारे निर्यात करण्यासंदर्भात विचार केला जात आहे.
- किरण डोके, निर्यातदार, कंदर.