यूपीएससी परीक्षेत सोलापूरची पताका

By admin | Published: June 13, 2014 12:34 AM2014-06-13T00:34:54+5:302014-06-13T00:34:54+5:30

चौघांची निवड : माळशिरस तालुक्यातील दोघे

Solapur's passport in UPSC examination | यूपीएससी परीक्षेत सोलापूरची पताका

यूपीएससी परीक्षेत सोलापूरची पताका

Next


सोलापूर: केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेचा गुरुवारी निकाल लागून सोलापूरच्या चौघांनी आपली पताका फडकावली. विशेष म्हणजे यातील दोघे हे माळशिरस तालुक्यातील आहेत.
माळशिरस तालुक्यातील वटपळी येथील संजय ज्ञानदेव खरात हे देशात ५३५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. गोपाळपूर येथील अभिजित दिलीप गुरव हे ६७२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
माळशिरस तालुक्यातील हिमालय काशिनाथ देवकते हे ७२७ क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सोलापूर येथील सौरभ सूर्यभान रासकर हे ९२४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
अत्यंत खडतर परिश्रम घेत हे यश मिळविल्याची प्रतिक्रिया या चौघांनी व्यक्त केली. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल आल्यानंतर जिल्ह्यात या चौघांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला. या चौघांच्याही कुटुंबीयांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना भविष्यात चांगली कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Web Title: Solapur's passport in UPSC examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.