दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात सोलापूरच्या 'रितू'चं उपकरण दिसणार 

By काशिनाथ वाघमारे | Published: October 6, 2023 11:19 PM2023-10-06T23:19:09+5:302023-10-06T23:20:02+5:30

  सोलापूर : दिल्लीत इदिरा गांधी स्टेडियम येथे ९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान दहावे राष्ट्रीय इन्सपायर अवार्ड योजनेतंर्गत राष्ट्रीय ...

Solapur's 'Ritu' device will be seen at the National Science Exhibition in Delhi | दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात सोलापूरच्या 'रितू'चं उपकरण दिसणार 

दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात सोलापूरच्या 'रितू'चं उपकरण दिसणार 

googlenewsNext

 सोलापूर : दिल्लीत इदिरा गांधी स्टेडियम येथे ९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान दहावे राष्ट्रीय इन्सपायर अवार्ड योजनेतंर्गत राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन भरत आहे. या प्रदर्शनात सोलापुरातील  राजराजेश्वरी माध्यमिक प्रशालेची विद्यार्थीनी रितू कलबुर्गी हिने बनवलेल्या शेवाळ हटविणारे अलगी क्लिनींग मशीन या उपकरणाची निवड झाली आहे. विज्ञान शिक्षक शीतल पाटील यांच्या मदतीने हे उपकरण घेऊन ती दिल्लीतील विज्ञान प्रदर्शनाला रवाना झाली आहे. विशेषत: या उपकरणाच्या निर्मितीसाठी केंद्रसरकारने १५ हजारांची मदत दिली आहे. ही सोलापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

सोलापुरात विनायक नगरात राजराजेश्वरी माध्यमिक प्रशालेतील शिकणा-या रितू कलबुर्गीने फरशीवर वाढलेलं शेवाळ हटवणारे अलगी क्लिनिंग मशीन हे विज्ञान उपकरण बनवले आहे. दिल्लीत भरलेल्या या प्रदर्शनात महाराष्ट्रातून २८ तर देशभरातून ६०० विद्यार्थी सहभागी होत आहेत.  उपकरण निर्मिती खर्चाबरोबर सोलापूर-दिल्ली-सोलापूर प्रवास खर्चही सरकारमार्फत देण्यात आले आहे. आज उपकरण साहित्य घेऊन कलबुर्गी व विज्ञान शिक्षक शीतल पाटील दिल्लीला रवाना झाले.

 हे उपकरण कमी खर्चिक व वेळ वाचविण्यासाठी तयार करण्यात आले आहे. पावसाळ्यात ओलसर जागी भींतीवर, फरशीवर शेवाळ निर्मिती होते. ती काढण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होतो.  

यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार, प्रशालेचे मुख्याध्यापक विश्वनाथ तंबाके, मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे यांन कौतूक केले आहे.

Web Title: Solapur's 'Ritu' device will be seen at the National Science Exhibition in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.