सोलापूरच्या आरटीओ पथकाने जखमीला केली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:38 AM2018-07-21T11:38:00+5:302018-07-21T11:42:13+5:30

जीप नेली दवाखान्यात : दुसºयांदा केले कर्तव्याचे पालन

Solapur's RTI team helped injured injured | सोलापूरच्या आरटीओ पथकाने जखमीला केली मदत

सोलापूरच्या आरटीओ पथकाने जखमीला केली मदत

Next
ठळक मुद्देदेगावजवळ टेम्पोतील जखमीला आरटीओच्या पथकाने मदत केलीपुणे महामार्गावर जखमींना मदत मोहोळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल

सोलापूर : पुणे महामार्गावर हिवरेपाटीजवळ जखमी अवस्थेत आढळलेल्या मोटरसायकलस्वारास आरटीओच्या पथकाने जीपमधून मोहोळच्या रुग्णालयात दाखल केले. आरटीओच्या पथकाने दुसºयांदा अपघातग्रस्तास मदत करून कर्तव्यपालन केल्याचे दिसून आले आहे. 

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांच्या आदेशान्वये आषाढी वारीनिमित्त एमएच 0४/इपी १३१३ या क्रमांकाच्या जीपमधून मोटार वाहन निरीक्षक अनिल शिंदे, सहायक निरीक्षक उदय साळुंके, संतोष डुकरे, चालक विशाल डोंबाळे यांचे पथक पुणे महामार्गावर वाहन तपासणीकामी गस्त घालत फिरत होते. शेटफळवरून हे पथक परतत असताना हिवरेपाटीजवळ चुकीच्या बाजूने आलेल्या ट्रकने (एमएच 0४/ ईबी ७१७७) मोटरसायकलीस (एमएच १४/आर ६४0७) धडक दिली. यात मोटरसायकलस्वार रवींद्र श्रीरंग शिंगाडे (वय ३२, रा. हिवरे, ता. मोहोळ) हा गंभीर जखमी झाला.

अपघात ठिकाणी बघ्याची गर्दी जमली होती. काही लोकांनी मदतीसाठी अ‍ॅम्बुलन्सला फोन केला होता. जखमीची अवस्था पाहून पथकातील अधिकाºयांनी वेळ न दवडता लोकांच्या मदतीने त्याला जीपमध्ये घातले व तातडीने मोहोळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तोवर अ‍ॅम्बुलन्स आली. मोहोळ येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्या जखमीला सोलापूरसाठी हलविण्यात आले. 

पंढरपूर मार्गावर देगावजवळ टेम्पोतील जखमीला आरटीओच्या पथकाने मदत केली होती. त्यानंतर दुसºयांदा पथकाने कर्तव्याचे पालन केल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. पुणे महामार्गावर जखमींना मदत करण्यासाठी टोलपथक व महामार्ग पोलिसांची व्यवस्था आहे. पण महामार्ग पोलीस टोलजवळ थांबून वाहन तपासणी करताना दिसून येत आहेत. 

Web Title: Solapur's RTI team helped injured injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.