अक्कलकोटच्या स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सौरऊर्जा प्रकल्प साकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 01:08 PM2019-02-14T13:08:01+5:302019-02-14T13:10:32+5:30
अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे सौरऊर्जा प्रकल्प साकारण्यात आला. या प्रकल्पाच्या पॅनलचे पूजन प्रमुख कार्यकारी विश्वस्त ...
अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे सौरऊर्जा प्रकल्प साकारण्यात आला. या प्रकल्पाच्या पॅनलचे पूजन प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी ही संकल्पना मांडून ती पूर्णत्वास आणली. या नावीन्यपूर्ण प्रकल्पामुळे न्यासाच्या सुरू असलेल्या विकासात भर पडणार आहे. दरवर्षी गुरुपौर्णिमा होणाºया कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या अद्ययावत अँगल, पत्रे आच्छादित यावर सदरचा प्रकल्प राबविला जात आहे.
यावेळी दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे सदस्य धनेश अचलेरे, नगरसेवक सद्दाम शेरीकर, मुबारक कोरबू, मंडळाचे सचिव शामकाका मोरे, मंडळाचे पुरोहित अप्पू पुजारी, स्पार्क इन कंपनीचे विजय माळगे, पी.एस. भावे, राष्ट्रवादी युवकचे शंकर उर्फ बंटी पाटील, अतिश पवार, अमर पोतदार, सनी सोनटक्के, प्रसाद मोरे, भरत राजेगावकर, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, सिध्देश्वर पुजारी आदींसह स्वामीभक्त, सेवेकरी, कर्मचारी उपस्थित होते.
रौफ टॉपमध्ये ७५८ पॅनलच्या माध्यमातून बाराशे युनिट वीज मंडळाच्या परिसरात असलेली महाप्रसादालये, यात्री निवास, यात्री भवन, समर्थ वाटिका, स्ट्रीट लाईट, शिवस्मारक, प्रदर्शन आदी उपक्रमांकरिता उपयोगात येणार आहे. या प्रकल्पामुळे मंडळास ७५टक्के वीज उपलब्ध होणार आहे.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम होत आहेत. याकरिता वीज आवश्यक आहे. याकरिता सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्माण केली जाणार आहे. हा उपक्रम काळाची गरज ओळखून न्यास राबवत असल्याचे अमोलराजे भोसले यांनी सांगितले.
पहिले न्यास
- या प्रकल्पाबाबत माहिती देताना विजय माळगे म्हणाले, जन्मेजयराजे भोसले यांनी सौर ऊर्जेला महत्त्व देऊन हा प्रकल्प हाती घेतला असून, यामुळे मंडळाची मोठी बचत होणार आहे. न्यासाला दिलेल्या मुदतीच्या आत हे काम पूर्ण करून देत असून आदर्श न्यास, आदर्श काम यामुळेच स्वामीभक्तांना स्मार्ट तीर्थक्षेत्र अक्कलकोट पाहावयास मिळत आहे. हा प्रकल्प राज्यातला पहिला व अव्वल आहे.