सौर दिव्यांची तरतूद केली रद्द

By admin | Published: June 2, 2014 12:28 AM2014-06-02T00:28:37+5:302014-06-02T00:28:37+5:30

पाणी अडविण्याच्या कामाला निधी वर्ग

Solar lights have been canceled | सौर दिव्यांची तरतूद केली रद्द

सौर दिव्यांची तरतूद केली रद्द

Next

सोलापूर: पाणी अडविण्याची कामे प्राधान्याने घ्या, असे सांगत त्यासाठी निधी वाढवून देण्याची मागणी जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांकडून येताच सौरदिव्यांची तरतूद रद्द करुन, तीन कोटींचा निधी सिमेंट बंधार्‍याच्या कामांना वर्ग करण्याचा निर्णय पालकमंत्री दिलीप सोपल यांनी घेतला. जिल्हा नियोजन बैठकीनंतर जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांशी व अधिकार्‍यांशी पालकमंत्र्यांनी चर्चा केली. आषाढीवारीसाठी यापूर्वी तीन कोटी रुपये दिले असले तरी राज्याच्या विविध भागातून येणार्‍या पालख्यांची संख्या व येण्यासाठीचे रस्ते वेगवेगळे आहेत. त्यासाठी आणखीन सव्वाकोटी रुपये वाढवून देण्याची मागणी समाजकल्याणचे सभापती शिवाजी कांबळे यांनी केली. ही रक्कम देण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. पाणी अडविण्याची कामे प्राधान्याने घ्या, नाला सरळीकरण व नवीन सिमेंट बंधार्‍यांच्या कामांना निधी द्या, अशी मागणी जि.प. पदाधिकार्‍यांनी केली. पालकमंत्री दिलीप सोपल यांनी सौरदिव्यांसाठीची तीन कोटींची रक्कम तरतूद रद्द करीत ही रक्कम सिमेंट बंधार्‍यांसाठी द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांना दिल्या.

--------------------

उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले अऩ़़् उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजनच्या निधीतून सौरदिवे घेऊ नका, असे जिल्हाधिकारी, सीईओ, जि.प. पदाधिकार्‍यांना सांगितले होते. तरीही जि.प.ने सौरदिव्यांसाठी पाच कोटींची मागणी केली होती. तरतूद केलेली तीन कोटींची रक्कम पाणी अडविण्याच्या कामांना वर्ग करुन उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन केले. हा निधी आता पाणी अडविण्याच्या कामांना सत्कारणी लागणार आहे.

Web Title: Solar lights have been canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.