घनकचरा व्यवस्थापन ही व्यवसायाची संधी : परिचारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:21 AM2021-04-06T04:21:03+5:302021-04-06T04:21:03+5:30
शेळवे (ता. पंढरपूर) येथील कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातर्फे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. ...
शेळवे (ता. पंढरपूर) येथील कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनीअरिंग विभागातर्फे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यासाठी प्राचार्य डॉ. एस.पी. पाटील व उपप्राचार्य प्रा. जगदीश मुडेगावकर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. मुडेगावकर यांनी विद्यार्थ्यांना कार्यशाळेच्या माध्यमातून तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून मिळालेल्या ज्ञानाचा फायदा होईल व आपले भविष्य उज्ज्वल होईल, असे सांगितले. यावेळी ॲण्टोनी लारा इनविवो सोल्युशन कंपनीचे बीएलएफ ऑपरेशन ऑफिसर गौरव पवार यांनी सस्टेनेबल प्रॅक्टिसेस फॉर लॅण्ड फील ऑपरेशन्स या विषयावर मार्गदर्शन केले. यासाठी प्रा. अनिल बाबर, प्रा. प्रदीप झांबरे, प्रा. अतुल सुतार, प्रा. सागर पवार, प्रा. मनीषा पाटील, प्रा. विकास साळुंखे, प्रा. समीर उपासे, प्रा. केदार बारसावडे, प्रा. दीपक भोसले यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. अनिल बाबर व प्रा. प्रदीप झांबरे यांनी केले. प्रा. मनीषा पाटील यांनी आभार मानले.