सोलापूर जिल्ह्यात ऊसदर आंदोलन पेटले, दोन ट्रॅक्टरचे १८ टायर फोडले, शेतकरी संघटना संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:24 PM2017-11-16T12:24:00+5:302017-11-16T12:29:36+5:30

ऊस दराचा तिढा अद्याप न सुटल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, रयत शेतकरी संघटना आदी शेतकºयांच्या हिताच्या संघटना आक्रमक झाल्या.

Solidarity agitated in Solapur district, 18 tires of two tractors, farmers' organization angry | सोलापूर जिल्ह्यात ऊसदर आंदोलन पेटले, दोन ट्रॅक्टरचे १८ टायर फोडले, शेतकरी संघटना संतप्त

सोलापूर जिल्ह्यात ऊसदर आंदोलन पेटले, दोन ट्रॅक्टरचे १८ टायर फोडले, शेतकरी संघटना संतप्त

Next
ठळक मुद्दे जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, मंगळवेढ्यात शेतकºयांनी रस्तारोको आंदोलनमंत्रालयात झालेल्या बैठकीत कुठलाच तोडगा न निघाल्याने ऊस दराचा प्रश्न कागदावरचपोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांना सोडून देण्यात आले


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १६  : ऊस दराचा तिढा अद्याप न सुटल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, रयत शेतकरी संघटना आदी शेतकºयांच्या हिताच्या संघटना आक्रमक झाल्या असून, बुधवारी सोलापूर शहरासह जिल्ह्यात या संघटनांची आक्रमकता दिसून आली. जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला, मंगळवेढ्यात शेतकºयांनी रस्तारोको आंदोलन करीत ठिय्या मारला. 
 सोमवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत कुठलाच तोडगा न निघाल्याने ऊस दराचा प्रश्न कागदावरच राहिला. राज्य शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध म्हणून बुधवारी शेतकरी संघटनांच्या आंदोलनात ऊस उत्पादकासह शेतकरी सामील झाले होते. रस्ता रोको आंदोलनामुळे राज्य मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांना सोडून देण्यात आले.
माचणूर रस्त्यावर शेतकºयांचा ठिय्या
मंगळवेढा : उसाला पहिला हप्ता ३०००  रुपये द्यावा, या मागणीसाठी आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी १० वाजता मंगळवेढा -सोलापूर महामार्गावर माचणूर येथे रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रांग लागली होती.
पुणे येथील ऊसदराबाबतची बैठक फिसकटल्याने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सोमवारी रात्री उशिरा नंदूरजवळ उसाचा ट्रॅक्टर पेटवून दिला होता. कारखानदार ऊसदर जाहीर न करता ऊस वाहतूक करीत असल्याने कार्यकर्त्यांनी कारखानदाराची नाकेबंदी करण्यासाठी गनिमी काव्याने आंदोलन सुरू केले आहे.
दि १५ नोव्हेंबर रोजी बुधवारी माचणूर येथून रस्ता रोको करून आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. 
यावेळी ज्ञानेश्वर बाबर म्हणाले की, कारखानदार स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांनी गुप्त बैठका घेऊन जाणीवपूर्वक दर जाहीर केला नाही. शेतकºयांना लुटणाºया साखर सम्राटांना वठणीवर आणण्यासाठी शेतकºयांनी आता एकजुट दाखवून तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसण्याची गरज बनली आहे. 
स्वाभिमानीचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राहुल घुले म्हणाले की, कारखानदाराची अभद्र युती झाल्याने त्यांनी दर जाहीर न करता ऊस गाळप सुरू केले आहे. ३००० रुपये पहिला हप्ता देईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार आहे. 
यावेळी स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष अनिल बिराजदार, राहुल घुले, माऊली बाबर, अशोक बेदरे, राजेंद्र रणे,  कल्लाप्पा डोके, संजय पाटील, सूरज चव्हाण, अमोल बाबर, मळसिद्ध कुंभार, सुरेश बाबर, दीपक कलुबर्मे, लक्ष्मण सावंत, सुरेश सोमगुंडे, बापू शिंदे, सचिन बेदरे, समाधान बाबर, हमू सुतार, बंडू बेदरे, किशोर बाबर, उत्तम पवार, अशोक मोरे, तात्यासाहेब पवार, प्रकाश पाटील, आनंद पाटील, मल्लिकार्जुन सोमगुंडे, गंगाराम कुंभार, शांतपा कुंभार, बलभीम नकाते, आणासाहेब शिरसट, बाळकृष्ण मोरे, गोटू देशमुखे, यांच्यासह सिद्धापूर, अरळी, बोराळे, माचणूर, रहाटेवाडी, तामदर्डी, ब्रह्मपुरी, बठाण, उचेठाण या गावातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे व उपनिरीक्षक शाहूराजे दळवी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होतो़
-----------------
तर पोलीस प्रशासनाने नाचू नये !
मंगळवेढा तालुक्यातील खासगी कारखानदारांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाला गाड्या पुरवल्या आहेत. त्यांच्या जीवावर पोलीस अधिकाºयांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना वेठीस धरू नये. आंदोलनाचा वणवा भडकू द्यायचा नसेल तर पोलीस अधिकाºयांनी कारखानदारांनाही दर जाहीर करण्यास सांगावे, असे आवाहन स्वाभिमानी संघटनेचे राहुल घुले यांनी केले आहे.
--------------
महूद-पंढरपूर रस्त्यावर दोन ट्रॅक्टरचे १८ टायर फोडले
- सांगोला : अज्ञात चौघांनी पाठीमागून येऊन ऊस घेऊन निघालेल्या दोन ट्रॅक्टर व ट्रॉलीचे १८ टायर फोडून ४५ हजार रुपयांचे नुकसान केले. ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास महुद-पंढरपूर रस्त्यावरील तुळजाभवानी धाब्याजवळ घडली. याबाबत बाळासाहेब नामदेव पवार (रा. उंबरगाव, ता. पंढरपूर) यांनी अज्ञात चौघांविरुद्ध सांगोला पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
- उसाला एफआरपीनुसार दर देण्यासाठी शेतकरी संघटनेचे जिल्हाभर आंदोलन सुरू असल्याने सांगोला पोलीस स्टेशनचे पो. नि. राजकुमार केंद्रे यांनी  महुद-पंढरपूर, महुद-भाळवणी, महुद-सांगोला आदी रस्त्यावर पोलीस अधिकारी, कर्मचाºयांची गस्त वाढविली असून, आंदोलकांवर करडी नजर ठेवली आहे. 
- उंबरगाव (ता. पंढरपूर) येथील बाळासाहेब नामदेव पवार यांच्या मालकीच्या (क्र. एम. एच. १३ एजे ३५४२) ट्रॅक्टरमधून खर्डी (ता. पंढरपूर) येथील पोपट पाटील यांच्या शेतातील तोडलेला ऊस घेऊन खर्डी, तिसंगी, महुद, महिम, भाळवणी मार्गे सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याकडे निघाला होता. त्यांचा ट्रॅक्टर महुद रस्त्यावरील तुळजाभवानी धाब्याच्या पुढे अर्धा कि. मी. आला असता मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पाठीमागून आलेल्या अज्ञात चार इसमांनी       ट्रॅक्टर थांबवून हातातील कशाच्यातरी सह्याने ट्रॅक्टर व ट्रॉलीचे मिळून ७ टायर फोडले.  यावेळी पाठीमागून येणारा दुसरा ट्रॅक्टर (क्र. एम एच १३ ए जे २१०६) व ट्रॉलीचे  ११ टायर फोडून ४५ हजार रुपयांचे नुकसान करून ते चौघेजण पसार झाले.

Web Title: Solidarity agitated in Solapur district, 18 tires of two tractors, farmers' organization angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.