अत्याचाराच्या विरोधात पद्मशाली समाजासह सर्वपक्षीयांचा सोलापूरात मुकमोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 03:12 PM2018-09-19T15:12:37+5:302018-09-19T15:13:56+5:30
अहमदनगर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचे बुधवारी सोलापुरात तीव्र पडसाद उमटले
सोलापूर : अहमदनगर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचे बुधवारी सोलापुरात तीव्र पडसाद उमटले. पद्मशाली ज्ञाती संस्थेने या माणुसकीला काळीमा फासणाºया घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या. पूर्वभागातील बहूभाषिकांसह शहरातील सर्वसमाजबांधवांनी या मोर्चात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गुन्हेगाराला कठोर शासन झाले पाहिजे अशी एकमुखी मागणी सरकारकडे केली. समाजबांधवांनी यावेळी उत्स्फूर्त सहभागासह समाजातील संवेदना जागवण्याचा प्रयत्न केला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांना देण्यात आले़
कन्ना चौकात सकाळी ८ पासून गटागटाने चारही बाजूने पद्मशाली, साळी समाजातील विविध संघटना काळे झेंडे घेऊन जमा होऊ लागले. प्रत्येकाच्या चेहºयावर चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराबद्दल चिड दिसत होती. अनेकांनी दंडाला काळ्या फिती लावलेल्या दिसत होत्या. भवानी पेठ, रविवार पेठ, राजेंद्र चौक, विडी घरकूल परिसरात लोकांचा, विविध शाळांतील विद्यार्थ्यांचा जत्था एकत्र जमत होता. नागरिकांना सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेनाची सोय केली होती.
मोचार्चे शिस्तबद्ध पद्धतीने नियोयज करण्यासाठी सुरेश फलमारी, अनिल वासम सूचना देत होते. विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्भिनींचा उत्स्फूर्त सहभाग होता. प्रत्येकांनी शिस्तीने रांगेत मोर्चात सहभागी होण्यासाठी सूचना दिल्या जात होत्या. सकाळी १० वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. बरोबर १०.३० वाजता मोर्चास प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांच्या हातात अत्याचाराबद्दल निषेध व्यक्त करणारे फलक लक्ष वेधून घेत होते. मोर्चाच्या अग्रभागी निषेध व्यक्त करणारा फलक त्यानंतर शाळकरी, त्यांच्या मागे समाजातील विविध स्तरातील लोकांचा सहभाग होता.
महाराष्टÑात सर्वत्र या घटनेचे पडसाद उमटत असताना सोमवारी समाजबांधवांनी मूक मोचार्चे नियोजन केले. मंगळवारी महापालिकेच्या सभेत या अत्याचाराचे पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी प्रारंभीच या घटेनेचा निषेध करीत सभा तहकूब करण्याची विनंती केली होती़ घटनेची तीव्रता लक्षात घेऊन सर्वपक्षीयांनी एकमुखी निर्णय घेतला. दोन दिवसात नियोजन केले तरी सर्वसमाजबांधवांनी या मोर्चात सहभाग नोंदवला.