गुंडांना शोधण्यासाठी सोलापूरात कोम्बिंग आॅपरेशन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:15 PM2018-07-11T12:15:50+5:302018-07-11T12:18:13+5:30
पोलीस आयुक्त : शांतता-सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा फिक्स पॉर्इंट
सोलापूर : गेल्या काही वर्षांपासून शांत असलेल्या सोलापूर शहरात शनिवारी रात्री मोबाईल गल्लीत झालेल्या सत्यवान उर्फ आबा कांबळे यांच्या खूनप्रकरणाने शहरभर एकच चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी सन २००४ ते सद्यस्थितीपर्यंत पोलीस रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांचा रेकॉर्ड तपासणार आहे. शिवाय शहरात दहशत पसरविणाºया गुंडांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोम्बिंग आॅपरेशन करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिली.
शनिवारी मोबाईल गल्ली येथे सत्यवान उर्फ आबा कांबळे यांचा निर्घृण खून केल्यावरुन पोलिसांनी गामा पैलवान, रविराज शिंदे, अभिजित शिंदे, प्रशांत शिंदे, विनीत खाणोरे, तौसिफ विजापुरे, नीलेश महामुनी यांना पोलिसांनी २४ तासात अटक करुन लोकांमध्ये असलेली भीती दूर करण्यासाठी शांततेचे आवाहन करीत गजबजलेल्या नवीपेठेतील व्यापाºयांना दिलासा देण्याचे काम केले.
घटनेनंतर दुसºया दिवशी काही जणांनी नवीपेठेत दहशत माजवून दुकाने बंद करण्यासाठी आरडाओरडा केल्याने व्यापाºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी लागलीच या प्रकरणी प्रमोद बनसोडे, विशाल बनसोडे, आकाश गुरव, प्रशांत गुरव, सोनू कदमसह सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला.
आरसीपीची फौज तैनात
नवी पेठ येथे चोख बंदोबस्त तैनात केला असून नागरिकांना निर्भय होण्याच्या दृष्टीने फिक्स पॉर्इंट नेमला आहे. नवीवेस पोलीस चौकीसमोर या घटनेचे पडसाद निवळेपर्यंत आरसीपीची फौज तैनात करण्यात आली अहे.
व्यापाºयांमध्ये असणारी भीती घालवण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्तांनी बैठक घेऊन त्यांना दिलासा देत चोख पोलीस बंदोबस्त पुरवण्याचे आश्वासन देत कोणीही न घाबरता आपापली दुकाने चालू ठेवण्याचे आवाहन करताना नवीपेठेत फिक्स पॉर्इंट नेमल्याचे स्पष्ट केले. शिवाय ३० जणांचे आरसीपी पथक कायमस्वरूपी तैनात केल्याचे सांगितले. व्यापाºयांमध्ये पोलिसांबद्दल विश्वासार्हता निर्माण व्हावी, यासाठी २४ तास पेट्रोलिंगही चालू असून कोठे अनुचित प्रकार घडताना दिसल्यास तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा प्रत्यक्ष मला संपर्क साधण्याचे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले.
तपासासाठी पोलीस १४ वर्षांचे रेकॉर्ड तपासणार
- निर्घृणपणे खून झालेल्या सत्यवान उर्फ आबा कांबळे यांच्या खूनप्रकरणानंतर शहरभर एकच खळबळ उडालेली असताना ज्या गुन्ह्याखाली मयत आबा कांबळे याला शिक्षा झाली होती. त्या अनुषंगाने सन २००४ पासूनच्या गुन्हेगारांची पोलीस रेकॉर्डवरील तपासणी करुन या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आढळल्यास त्याच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. आजवर झालेल्या तपासात सात आरोपी निष्पन्न झाले असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
कठोर कारवाई करणार
- शहराचे स्वास्थ्य अबाधित राहावे. नागरिकांमध्ये नाहक घबराट पसरवू नये आणि असे कोणी करताना आढळले तर कोणाचाही मुलाहिजा न बाळगता त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. कोणीही दहशतीखाली वावरू नये. पोलीस खाते जनतेच्या रक्षणासाठी तत्पर आहे, असा विश्वास पोलीस आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.