अत्यल्प पावसाने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:49 AM2018-08-27T10:49:07+5:302018-08-27T10:51:43+5:30

२७ मंडलांवर १०० तर सहा मंडलांत ३५ मि.मी. पेक्षा कमी पाऊस 

Solutor farmers in Solapur district | अत्यल्प पावसाने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत

अत्यल्प पावसाने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाभरात कमी-अधिक प्रमाणात पावसाच्या सरी पडू लागल्याअक्कलकोट व बार्शी तालुक्याचा काही भाग वगळता पाऊस गायब जिल्हाभरात एकूण १६३१.७३ मि.मी. तर सरासरी १४८.३४ मि.मी. इतकाच पाऊस पडला

सोलापूर : जिल्ह्यातील २७ मंडलांमध्ये आजही १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस पडला असून, मार्डी, शेटफळ, टेंभुर्णी, म्हैसगाव, अर्जुननगर व इस्लामपूर मंडलात तर ३५ मि.मी. पेक्षाही कमी (अत्यल्प) पाऊस पडला आहे. जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्के इतकाच पाऊस पडल्याने शेतकºयांमधील चिंता वाढली आहे.

सोलापूर जिल्ह्यात ९१ महसूल मंडले असून या सर्व मंडलात २५ आॅगस्टपर्यंत एकूण ३१५९ मि.मी. तर सरासरी २८७ मि.मी.पाऊस पडणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात एकूण १६३१.७३ मि.मी. तर सरासरी १४८.३४ मि.मी. इतकाच पाऊस पडला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर तब्बल अडीच महिने अक्कलकोट व बार्शी तालुक्याचा काही भाग वगळता पाऊस गायब झाला.

त्यानंतर १५ आॅगस्टपासून जिल्हाभरात कमी-अधिक प्रमाणात पावसाच्या सरी पडू लागल्या आहेत; मात्र पावसाचे प्रमाण फारच कमी आहे. ९१ पैकी १७ मंडलात १०० मि.मी. पेक्षाही कमी पाऊस पडला आहे. यामधील ६ मंडलात तर पाऊस ३५ मि.मी. ही पडला नाही. मार्डी (उत्तर सोलापूर), शेटफळ (मोहोळ), म्हैसगाव, टेंभुर्णी(माढा), अर्जुननगर, इस्लामपूर (माळशिरस) या मंडलात अत्यल्प पाऊस पडला आहे. मार्डी व शेटफळ मंडलात प्रत्येकी ३३ मि.मी., म्हैसगाव मंडलात ३० मि.मी. , टेंभुर्णी व अर्जुननगर  मंडलात प्रत्य्रेकी ३५ मि.मी. तर इस्लामपूर मंडलात अवघा २८ मि. मी. पाऊस पडला आहे. 

तिºहे, वळसंग, मुस्ती, बोरामणी, जेऊर(अक्कलकोट), लऊळ, रोपळे(क), केत्तूर, जेऊर(करमाळा), सालसे, हतीद, नाझरा, संगेवाडी, सोनंद, जवळा, माळशिरस, वेळापूर, दहिगाव, मरवडे, हुलजंती, भोसे,आंधळगाव, मारापूर या मंडलात ४५ ते ९९ मि.मी. पाऊस पडला आहे.

अपेक्षित व कंसात प्रत्यक्षात पडलेला पाऊस
- उत्तर तालुका- ३३०.१६ मि.मी.(१६८.६२ मि.मी.), दक्षिण तालुका- ३३०.१६ मि.मी., (१४८.८९ मि.मी.), बार्शी- ३३२.४६ मि.मी.(२९४ मि.मी.), अक्कलकोट- ३७८ मि.मी.(१८२ मि.मी.), मोहोळ- २९९.३१ मि.मी.(१६१.५९ मि.मी.), माढा- २५९.७५ मि.मी.(११६.५३ मि.मी.), करमाळा- २७३.८२ मि.मी.(९९.८० मि.मी.), पंढरपूर- २७५.८५ मि.मी.(१४९.५९ मि.मी.), सांगोला- २१८ मि.मी.(९६ मि.मी.), माळशिरस- २०५.४३ मि.मी.(१०८.३१ मि.मी.) मंगळवेढा- २५६.१२ मि.मी.(१०६.१५ मि.मी.) 

काही मंडलांमध्ये पाऊस कमी आहे. यामुळे या मंडलातील सर्वच प्रकारच्या पिकांवर परिणाम झाला आहे. काही मंडलातील काही गावांतील पिकांना उजनी धरण व अन्य धरणातील पाण्याचा फायदा होऊ शकतो.
बसवराज बिराजदार
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

Web Title: Solutor farmers in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.