शिक्षकांचे प्रश्न सोडवूच; शिक्षणाची विस्कटलेली घडीही बसवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:24 AM2021-09-27T04:24:21+5:302021-09-27T04:24:21+5:30
पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर यांच्या जुळे सोलापुरातील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते ...
पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर यांच्या जुळे सोलापुरातील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर शिक्षकांच्या चर्चासत्रात बोलताना सतेज (बंटी) पाटील यांनी शिक्षकांच्या प्रश्नांना हात घातला. आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी प्रास्ताविकात शिक्षकांच्या प्रश्नासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. यावेळी प्रा. सुभाष माने, प्रा. तानाजी माने, अण्णासाहेब भालशंकर, श्रावण बिराजदार, खंडेराव जगदाळे यांनी विनाअनुदानित शाळा, शिक्षकांच्या वेतनाचे प्रश्न, शालार्थ आयडीसाठी होणारा विलंब, बंद पडलेले वेतनेतर अनुदान, जुनी पेन्शन योजना याकडे शासनाचे लक्ष वेधले. व्यासपीठावर आमदार प्रणिती शिंदे, पदवीधर आमदार अरुण लाड, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, षडाक्षरी बिराजदार, शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, अण्णासाहेब गायकवाड, महेश सरवदे आदी उपस्थित होते.
..............
काँग्रेस कार्यकर्ते, संस्थाचालकांची गर्दी
संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर व्यासपीठावर काँग्रेसचे पदाधिकारी आणि संस्थाचालकांची मोठी गर्दी होती. याच कार्यक्रमात बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, शिक्षक आमदार काँग्रेसचे आहेत. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी नेहमीच काँग्रेस पक्षानेच घेतली आहे. आता शिक्षकांनी निर्धास्त राहावे.
------
कॅशलेस कार्डचा निर्णय चार दिवसात
प्राथमिक शाळातील शिक्षकांना वैद्यकीय उपचारासाठी कॅशलेस कार्ड देण्यात आली आहेत. माध्यमिक शिक्षकांना मात्र अजूनही वैद्यकीय प्रतिपूर्ती बिले सादर करावी लागतात. या बिलांच्या रकमा वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे माध्यमिक शिक्षकांनाही कॅशलेस कार्ड देण्याची मागणी श्रावण बिराजदार यांनी केली. शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्यासोबत बैठक घेऊन कॅशलेस कार्डचा निर्णय घेण्याची जबाबदारी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी स्वतःवर घेतली.
........
फोटो आहे.