संचारबंदीची कुणाला संधी तर कुणाला बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:17 AM2021-05-28T04:17:52+5:302021-05-28T04:17:52+5:30
संचारबंदी काळात शेती व शेतीपूरक व्यवसायाशी निगडित वस्तू अत्यावश्यक म्हणून घेणे ग्रामीण भागातील नागरिकांना क्रमप्राप्त ठरत आहे. सध्या पेट्रोल ...
संचारबंदी काळात शेती व शेतीपूरक व्यवसायाशी निगडित वस्तू अत्यावश्यक म्हणून घेणे ग्रामीण भागातील नागरिकांना क्रमप्राप्त ठरत आहे. सध्या पेट्रोल पंपावरील पेट्रोल विक्री बंद आहे. याउलट ग्रामीण भागात अनाधिकृतपणे चढ्या दराने पेट्रोल विक्री जोमात सुरू आहे. याशिवाय पूरक व्यवसायाशी संबंधित साधनसामग्रीला जादा पैसे मोजावे लागत आहेत. मात्र, याउलट लहान-मोठे अनेक व्यवसाय पूर्णपणे ठप्प असल्यामुळे ही बंदी अनेकांचे अर्थकारण उद्ध्वस्त करणारी ठरत आहे. मात्र, मोजक्या लोकांना ही संधी आर्थिक उन्नती करणारी ठरत आहे.
खर्च व उत्पन्नाची वाढली दरी
सर्वसामान्य नागरिकांचे उपजीविकेसाठी सुरू असलेल्या छोट्या व्यवसायातून उत्पन्न पूर्णपणे थांबले आहे. याउलट जीवनावश्यक वस्तूसाठी होणारा खर्च वाढत चालला आहे. जीवनावश्यक वस्तूंसोबत बँक, बचतगट, फायनान्स कंपन्या आदींचे कर्जाचे हप्ते अथवा दुकानगाळ्यांचे भाडे सुरू आहे. याशिवाय आवश्यक वस्तूंना मोजावी लागणारी अनावश्यक रक्कम यामुळे खर्च व उत्पन्नातील दरी वाढत चालली आहे.