सोमेश क्षीरसागर यांचे दुबार जात प्रमाणपत्र चुकीच्या मार्गाने मिळवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:15 AM2021-07-03T04:15:31+5:302021-07-03T04:15:31+5:30
याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, सोमेश क्षीरसागर यांचे जात प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याची माहिती त्यांनी ...
याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, सोमेश क्षीरसागर यांचे जात प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याची माहिती त्यांनी प्रशासनापासून लपवून ठेवली आहे. तसेच या बाबीची माहिती प्रांताधिकाऱ्यांना न देता बनावट कागदपत्रांच्या आधारे दुबार जात प्रमाणपत्र मिळविले आहे. त्यानंतर चुकीच्या मार्गाने जातवैधताही मिळवली आहे.
वास्तविक पाहता पडताळणी समितीने पहिली जात प्रमाणपत्र सुप्रिम कोर्टाने रद्द केले असल्याची माहिती असतानादेखील दुसऱ्या जात प्रमाणपत्राला वैधता दिली आहे. दक्षता पथक चौकशी अधिकाऱ्यांशी संगनमत करून एकतर्फी वैधता आदेश समितीने पारित केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या तक्रार अर्जावर जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे आणि आमदार यशवंत माने यांचे बंधू हनुमंत विठ्ठल माने यांच्या सह्या आहेत.
---