‘नांदण्याचं चांदणं’ करणाºया बायकोविरुद्ध सोलापुरातील ११२ पतींची कैफियत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:54 AM2018-10-31T11:54:25+5:302018-10-31T11:58:46+5:30
संताजी शिंदे सोलापूर : नांदवण्यास नकार देणाºया सासरच्या त्रासाला कंटाळून पतीसह सासू-सासºयांविरुद्ध तक्रार देणाºया महिलांची संख्या ४१२ इतकी आहे, ...
संताजी शिंदे
सोलापूर : नांदवण्यास नकार देणाºया सासरच्या त्रासाला कंटाळून पतीसह सासू-सासºयांविरुद्ध तक्रार देणाºया महिलांची संख्या ४१२ इतकी आहे, मात्र यामध्ये ‘नांदण्याचं चांदणं’ करणाºया बायकोविरुद्ध देखील ११२ पतींनी महिला तक्रार निवारण केंद्रात आपली कैफियत मांडली आहे.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने महिला तक्रार निवाण केंद्रामार्फत, महिलांवरील अन्याय-अत्याचाराची दखल घेतली जाते. महिलांवरील अन्याय अत्याचाराची दखल घेऊन संबंधित सासरच्या लोकांना बोलावून समज दिली जाते. यापुढे अन्याय करणार नाही, याची लेखी हमी घेतली जाते. शक्यतो पती-पत्नीचे मनपरिवर्तन करून पुन्हा त्यांचा संसार जोडला जातो. महिन्याकाठी २५ ते ३० तक्रारी या महिला तक्रार निवारण केंद्रात दाखल होत असतात. जानेवारी २०१८ ते आॅक्टोबर २०१८ दरम्यान आलेल्या दाखल झालेल्या तक्रारींमध्ये ११२ पतींनी पत्नी नांदायला येत नसल्याच्या तक्रारी दिल्या आहेत.
एका महिलेला राजकारण आणि सामाजिक कार्य करण्याची आवड आहे, मात्र पतीला ते मान्य नाही. पतीला मान्य नसल्याने पत्नीने थेट माहेरचा रस्ता धरला आहे. पत्नी माहेरी निघून गेल्याने पतीला विरह निर्माण झाला असून, ती पुन्हा नांदायला यावी, तिला कोणत्याही गोष्टीने दुखावले जाणार नाही, असा विनंती अर्ज पतीने महिला तक्रार निवारण केंद्रात केला आहे.
मी पती सोडेन; मात्र सामाजिक कार्य सोडणार नाही, अशी भूमिका सध्या महिलेची आहे. पत्नी नांदायला येत नाही म्हणून चक्क एका पोलिसाने महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रारी अर्ज दिला आहे. घरात सासू-सासरे टिकली का लावली नाही? म्हणून भांडतात. मेकअप का केला म्हणून ओरडतात. दिवसा झोपली का म्हणून चिडतात. सासरच्या लोकांचा मला कंटाळा आला आहे, असा आरोप करून पत्नीने पोलीस पतीस नांदण्यास नकार देत आहे. पोलीस पतीने काही झालं तरी माझी बायको माझ्याकडे पाठवा. ती म्हणेल तसा मी वागण्यास तयार आहे, असे तक्रारी अर्जात नमूद केले आहे.
पत्नी मारहाण करते, मला घटस्फोट पाहिजे...
- पत्नी नेहमी टोचून बोलते, मानसिक त्रास देते. छोट्या-छोट्या कारणावरून वाद घालते, मारहाण करते. मी तिच्या त्रासाला खूप कंटाळलो आहे. मला तिच्यापासून घटस्फोट पाहिजे, अशी मागणी करणारा अर्ज एका पतीने महिला तक्रार निवारण केंद्रात दिला आहे. यावर पत्नीने तुला घटस्फोट देत नाही, मात्र मी माझ्या मनासारखंच वागणार, असा दम पतीला भरत असते. पतीने पत्नीच्या त्रासाला मात्र सध्या खूप कंटाळलो आहे, मला न्याय द्या, अशी मागणी तक्रारी अर्जातून केली आहे.
आलेल्या तक्रारीची दखल घेतो, दोघा पती-पत्नीला समोर बोलावून घेतो. वैचारिक मतभेद दूर करतो आणि पुन्हा त्यांचा संसार सुरळीत कसा चालेल, हे पाहत असतो. पत्नींविरुद्ध आलेल्या तक्रारीही सामोपचाराने सोडवण्यावर महिला तक्रार निवारण केंद्राचा भर असतो.
-अभय डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा.