बाळ बोठेच्या अटकेसाठी सोलापूरच्या महिला पोलीस अधिकारी सोनाली पाटील-धांडे यांची भूमिका ठरली महत्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:05 PM2021-03-17T16:05:51+5:302021-03-17T16:16:59+5:30
अहमदनागरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्राद्वारे केले कौतुक
सोलापूर : अहमदनगर येथील समाजसेविका रेखा जरे खून प्रकरणातील फरार आरोपी पत्रकार बाळ बोठे याला नुकतीच अटक करण्यात आली आहे. या अटकेसाठी सोलापूरच्या महिला पोलिस अधिकारी सोनाली पाटील - धांडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सोनाली पाटील- धांडे या सोलापूरच्या पोलिस अधीक्षक कार्यालयात एटीएस सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत. त्यांनी आरोपी बाळ बोठे याला अटक करण्यासाठी तपास पथकाला मदत केली खुनानंतर तीन महिने आरोपी बाळ बोठे फरार होता .सोनाली पाटील-धांडे यांच्या मदतीमुळे बोठे याला जेरबंद करणं अहमदनगर येथील पोलीस पथकांना शक्य झालं.
अहमदनगरचे पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी आरोपी बाळ बोठे यांना अटक करण्यासाठी नऊ पथके नियुक्त केली होती. गेल्या आठवड्यात त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले . याकामी सोलापूरच्या महिला पोलीस अधिकारी सोनाली पाटील -धांडे यांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांचे अभिनंदन करणारे पत्र पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पाठवले आहे.