सोनवणे, माने यांचा तक्रार अर्ज निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:23 AM2021-07-29T04:23:16+5:302021-07-29T04:23:16+5:30

मोहोळ येथील शिवसेनेचे सोमेश क्षीरसागर यांचे पहिले जातीचे प्रमाणपत्र रद्द झाले असताना दुसरे जात प्रमाणपत्र मिळविले आहे. ...

Sonawane, Mane's complaint application settled | सोनवणे, माने यांचा तक्रार अर्ज निकाली

सोनवणे, माने यांचा तक्रार अर्ज निकाली

Next

मोहोळ येथील शिवसेनेचे सोमेश क्षीरसागर यांचे पहिले जातीचे प्रमाणपत्र रद्द झाले असताना दुसरे जात प्रमाणपत्र मिळविले आहे. त्यांना नियमबाह्य दाखला देण्यात आला आहे. सोमेश क्षीरसागर यांनी मिळविलेल्या जात प्रमाणपत्राची उपविभागीय अधिकारी सोलापूर यांच्याकडील मूळ संचिका मागवून त्यांचा अहवाल मागविण्यात यावा व नियमबाह्य जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्यात यावे, अशी मागणी जि. प. सदस्य शिवाजी सोनवणे व आ. यशवंत माने यांचे बंधू हनुमंत विठ्ठल माने यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केली होती.

त्या अनुषंगाने समितीने महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास वर्ग यांना जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे अधिनियम २००० चे कलम ७७२ नुसार समितीने घेतलेला निर्णय हा अंतिम असून, त्यास भारतीय संविधानातील कलम २२६ अन्वये माननीय उच्च न्यायालयात याचिकेद्वारे दाद मागता येते अशी तरतूद आहे.

----

जातपडताळणी समितीकडून पत्र

समितीने घेतलेल्या निर्णयांमध्ये पुनर्विलोकनाची तरतूद नसून, तसे समितीचे अधिकार नाहीत. त्यामुळे आपला तक्रारी अर्ज निकाली काढण्यात येत आहे, असे पत्र दिले. क्षीरसागर यांच्या विरोधातील त्यांचा तक्रारी अर्ज निकाली काढल्याचे पत्र सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर यांनी सोनवणे व माने यांना पाठविले आहे.

----

Web Title: Sonawane, Mane's complaint application settled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.