सोनोग्राफी, रक्त, थुंकीची तपासणीही आता ग्रामीण रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:24 AM2021-02-11T04:24:01+5:302021-02-11T04:24:01+5:30
अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयाची दुरवस्था झाली होती. मात्र, लोकसहभागातून काही व्यक्तींनी वेगवेगळे साहित्य दिले. प्रवेशद्वारासह अंतर्गत विविध कक्षांची रंगरंगोटी ...
अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयाची दुरवस्था झाली होती. मात्र, लोकसहभागातून काही व्यक्तींनी वेगवेगळे साहित्य दिले. प्रवेशद्वारासह अंतर्गत विविध कक्षांची रंगरंगोटी व सुशोभीकरण केले आहे. यामुळे रुग्णालय परिसर स्वच्छ व सुंदर दिसत आहे. मानसिक ताण घेऊन उपचारासाठी गेलेल्या रुग्णांना व नातेवाइकांना आता मानसिक समाधान लाभत आहे. लोकसभागातून रुग्णालयाचा चेहरा-मोहरा बदलून टाकण्याची किमया वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड व त्यांच्या टीमने केली आहे.
रुग्णालतील रक्त पदे
एक वैद्यकीय अधिकारी, एक्सरे काढणारे पद, स्वच्छता, धोबी, शिपाई अशा विविध प्रकारच्या जागा रिक्त आहेत. यामुळे या कामासाठी नित्याने अडचणी निर्माण होत आहेत. या रक्त जागा तत्काळ भराव्यात, अशी मागणी रुग्णांनी केल्या आहे.
यांनी दिली लोकवर्गणी
दिलीप सिद्धे, महेश इंगळे, वसंत देडे, दत्ता कटारे, देवानंद कवटगी, सिद्धाराम टाके, रोटरी क्लब, लायन्स क्लब, लखन झंपले, विशाल गव्हाणे, पलांडे, प्रथमेश पवार, सेहबाज येळसंगी, आरएसएस क्लब, यशवंत धोंगडे, आशेचे किरण पुणे, बंटी राठोड, मुन्ना राठोर, शिवशरण जोजन, इको नेचर, आत्या फाउंडेशन अशा विविध व्यक्ती व संस्थांनी विविध प्रकारचे साहित्य देऊन मदत केली आहे.
फोटो
१०अक्कलकोट-ग्रामीण रुग्णालय