मनसेचे कोविड ऑक्सिजन सेंटर सुरू होताच वाचले तिघांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:21 AM2021-05-15T04:21:00+5:302021-05-15T04:21:00+5:30

मनसेच्या या फिरत्या ऑक्सिजन सेंटरचा १० मे रोजी शुभारंभ झाला. ११ मे रोजी ...

As soon as MNS's Kovid Oxygen Center started, three lives were saved | मनसेचे कोविड ऑक्सिजन सेंटर सुरू होताच वाचले तिघांचे प्राण

मनसेचे कोविड ऑक्सिजन सेंटर सुरू होताच वाचले तिघांचे प्राण

Next

मनसेच्या या फिरत्या ऑक्सिजन सेंटरचा १० मे रोजी शुभारंभ झाला. ११ मे रोजी बीआयटी कॉलेज कोविड सेंटरमध्ये सुहास कांबळे (६३, रा. कुसळंब) यांची ऑक्सिजन लेव्हल ६० झाल्याने तो दगावण्याची शक्यता होती, पण त्याच्या नातेवाईकांनी या फिरते पथकाचे राजेंद्र गायकवाड यांना फोनवरून सांगताच या फिरत्या सेंटरमधूनच सुविधा हॉस्पिटलमध्ये दाखल करून तेथे डॉ. आवटे यांनी पुढील उपचार केले. वेळेवर ऑक्सिजन मिळाल्याने त्याचा जीव वाचला.

१२ रोजी निमगाव केतकी (ता. माढा) येथील सत्यवान बोडरे (६०) हे अस्वस्थ होते. त्यांना कोणत्याही हॉस्पिटल येथे बेड मिळाला नसल्याने ते बेशुद्ध होते. या फिरत्या पथकास फोन येताच त्यांनी तातडीने जाऊन हॉस्पिटलसमोरच बसमधील बेडवर रुग्णास तातडीने ऑक्सिजन लावून त्यास जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत तो वाढला व तेथे डॉ. अमोल जाधव यांनी उपचार करून प्राण वाचविले.

१३ रोजी मारुती गाडेकर (७५, रा. श्रीपतपिंपरी) हेही अस्वस्थ होते. त्यांचा ऑक्सिजन ६० वर पोहोचला होता. त्यामुळे राजेंद्र गायकवाड यांनी ग्रामीण रुग्णालयात डॉ. शीतल बोपलकर यांना विनंती करताच त्यांनी बेड रिकामे करून दिले. त्यानंतर ऑक्सिजन लावताच त्यात वाढ झाल्याने त्यास तातडीने जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला. अशा पद्धतीने मनसे कोविड आक्सिजन फिरते सेंटरचे शहर व ग्रामीण भागात काम सुरू असल्याने तीन रुग्णांचा जीव वाचला.

फोटो

१४बार्शी०१

ओळी

मनसेने सुरू केलेल्या फिरत्या कोविड ऑक्सिजन सेंटरचा लाभ घेताना रुग्ण.

Web Title: As soon as MNS's Kovid Oxygen Center started, three lives were saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.