आरक्षण जाहीर होताच अनेकांना आनंद तर भल्याभल्याचे मनसुबे उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:24 AM2021-02-11T04:24:12+5:302021-02-11T04:24:12+5:30
मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीचे प्रभाग निहाय आरक्षण घोषित झाले आहे. एकूण १७ नगरसेवकांसाठी असलेल्या या नगरपरिषदेसाठी सर्वसाधारण ५, सर्वसाधारण ...
मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीचे प्रभाग निहाय आरक्षण घोषित झाले आहे.
एकूण १७ नगरसेवकांसाठी असलेल्या या नगरपरिषदेसाठी सर्वसाधारण ५, सर्वसाधारण महिला ४, नागरिकांचा मागास प्रवर्ग २, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ३, अनुसूचित जाती १, अनुसूचित जाती महिला २ असे प्रभाग आरक्षित झाले आहेत.
दरम्यान अनेक प्रभागांमधील आरक्षणामध्ये बदल झाल्याने गेली सहा महिन्यापासून मीच आता या वार्डात उभा राहणार म्हणून तयारीला लागणा-या भल्याभल्यांचे मनसुबे उद्ध्वस्त झाल्याचे चित्र दिसत आहे. नव्याने घोषित झालेल्या मोहोळ नगरपरिषदेच्या कारभाराला पाच वर्ष पूर्ण होत आहेत. पहिल्याच नगरपरिषदेच्या कार्यंकाळात कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून शहरांमध्ये विविध कामे झाली. त्यामुळे नगर परिषदेमध्ये काम करण्यासाठी व नगरसेवक होण्यासाठी गेली दोन वर्षापासून अनेकांनी कंबर कसली होती. अनेकांनी दसरा, दिवाळी, पाडवा अशा विविध उत्सवांसह कोरोना महामारीच्या काळात अनेकांनी मदतीच्या स्वरूपामध्ये आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. १० रोजी नगरपरिषदेच्या आवारात आगामी निवडणुकीच्या १७ प्रभागाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आणि अनेकांच्या मनसुब्यावर पाणी फिरल्याचे चित्र दिसत होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी एन. के. पाटील, नायब तहसीलदार राजशेखर लिंबारे, प्रियंका चव्हाण, सुवर्णा हाके, मोईन डोणगावकर, मनोज पुराणिक, अमित लोमटे, महेश माने, राजकुमार सपाटे, दिनेश गायकवाड, राजू शेख, गोवर्धन अष्टुळ आदी उपस्थत होते, दरम्यान अनेकांच्या सोयीचे आरक्षण पडल्याने अनेक प्रभागांमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तर सोयीचे आरक्षण पडले नसल्याने अनेकजण निराश झाले.
असे आहे प्रभागनिहाय आरक्षण
नवीन आरक्षण पुढील प्रमाने
प्रभाग १ सर्वसाधारण महिला, प्रभाग २ ओबीसी महिला, प्रभाग ३ सर्वसाधारण महिला, प्रभाग ४ ओबीसी महिला, प्रभाग ५ सर्वसाधारण महिला, प्रभाग ६ एससी महिला ,
प्रभाग ७ एससी महिला ,
प्रभाग ८ सर्वसाधारण,
प्रभाग ९ सर्वसाधारण,
प्रभाग १० सर्वसाधारण महिला, प्रभाग ११ सर्वसाधारण,
प्रभाग १२ ओबीसी,
प्रभाग १३ अनुसूचित जाती ,
प्रभाग १४ सर्वसाधारण,
प्रभाग १५ ओबीसी ,
प्रभाग १६ ओबीसी महिला,
प्रभाग १७ सर्वसाधारण या प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर केली.