वीजबिल भरताच, तत्काळ जोडणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:21 AM2021-03-21T04:21:43+5:302021-03-21T04:21:43+5:30
ऊसतोड मजूर पुन्हा गावी परतले मंगळवेढा : तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील गावातील बहुसंख्य लोक हे कर्नाटकात ऊसतोड मजूर म्हणून जातात. ...
ऊसतोड मजूर पुन्हा गावी परतले
मंगळवेढा : तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील गावातील बहुसंख्य लोक हे कर्नाटकात ऊसतोड मजूर म्हणून जातात. प्रत्येक गावातील एक-दोन टाेळी असते. ते साधारणत: चार ते पाच महिने गाव सोडून गेले होते. आता अनेक कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. त्यामुळे हे ऊसतोड मजूर पुन्हा गावी परतू लागल्याचे चित्र दिसत आहे.
भीमा नदीचे पात्र कोरडेठाक
मंगळवेढा : जून २०२० पासून फेब्रुवारी २०२१ पर्यंत भीमा नदी पात्रात पाणी होते. यंदा प्रत्येक नक्षत्रात दमदार पाऊस झाला. उजनी व वीर धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे भीमा नदीत प्रवाहित होती. मात्र सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. शिवाय विद्युतपंपाद्वारे पाणी उपसा केल्याने भीमा नदीत कोरडीठाक पडली आहे. आता उजनीतून पाणी सोडल्यानंतर नदीपात्रात पाणी दिसेल.
जामगाव ते बेगमपूर रस्ता दुरुस्तीची मागणी
कामती : मोहोळ तालुक्यातील बेगमपूर ही मोठी बाजारपेठ आहे. त्या ठिकाणी विविध कामांनिमित्त परिसरातील अनेक नागरिकांची रोजच ये-जा असते. जामगाव, वटवटे, येणकी या मार्गावर सध्या खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.