पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:22 AM2021-07-29T04:22:53+5:302021-07-29T04:22:53+5:30

यावेळी संबंधित मंत्र्यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असणारी रेल्वे व रस्त्याची विविध विकासकामे मार्गी ...

To sort out the issues in Pandharpur-Mangalwedha constituency | पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी

Next

यावेळी संबंधित मंत्र्यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असणारी रेल्वे व रस्त्याची विविध विकासकामे मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

यामध्ये मंगळवेढा बाह्यवळण रस्ता, मंगळवेढा - पंढरपूर राज्य महामार्गापासून ते जुना मारापूर रस्ता, मंगळवेढामार्गे सांगोला ते सोलापूर, अकोला रस्तामार्गे रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग (मंगळवेढा - सांगोला) पर्यंतच्या रस्त्यास ३० मीटरचा बाह्यवळण रुंदीचा जोडणारा रस्ता, माचणूर- राहाटेवाडी जोडणारा ब्रिज व मंगळवेढा बोराळे जोडणारा ब्रिज, रेल्वेबाबत सांगोला - मंगळवेढा - सोलापूर व पंढरपूर - विजापूर या मार्गांना जोडणारी रेल्वे सुविधा संबंधित योजनेचे काम सुरू व्हावे, अशी मागणी करणारे पत्र आ. समाधान आवताडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री ना. अश्विन कुमार व रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे - पाटील यांना प्रत्यक्ष भेटून मागणी करण्यात आली. त्याचबरोबर मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या विकासकामांसाठी सी. आर. एफ. फंडामधून मतदारसंघातील रस्ते विकसित करण्यासाठी तब्ब्ल १४३ कोटी रुपयांच्या निधी मागणीचे पत्र देण्यात आले.

---

फोटो : २८ मंगळवेढा

पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देताना आमदार आवताडे.

270721\26551658-img-20210727-wa0030.jpg

फोटो ओळी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील रस्ते व रेल्वेच्या विविध मागण्यांचे निवेदन दिल्ली येथे नामदार नितीन गडकरी यांना देताना आमदार समाधान आवताडे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

Web Title: To sort out the issues in Pandharpur-Mangalwedha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.