सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा ध्वनी आज थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 10:48 AM2019-04-16T10:48:51+5:302019-04-16T10:52:47+5:30

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज मंगळवारी सायंकाळी थंडावणार आहेत. सोलापूरसाठी १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

The sound of campaigning will be held in Solapur Lok Sabha constituency today | सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा ध्वनी आज थांबणार

सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा ध्वनी आज थांबणार

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपसाठी मुख्यमंत्र्यांसह पदाधिकाºयांनी  घेतल्या प्रचारसभा प्रकाश आंबेडकरांसाठी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी येऊन गेले काँग्रेससाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोर्चेबांधणी 

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा मंगळवारी सायंकाळी थंडावणार आहेत. सोलापूरसाठी १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यंदाच्या निवडणूक प्रचारात ‘विकास’ फारसा दिसला नाही. उमेदवार, प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी वैयक्तिक टीकेवरच भर दिल्याचे पाहायला मिळाले.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत होत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे ही काँग्रेसच्या मतविभाजनासाठी असल्याचा आरोप सुरुवातीला करण्यात आला होता. परंतु, वंचित आघाडीने जोरदार प्रचार केल्यामुळे ही निवडणूक रंगतदार बनली. सोलापूर लोकसभा मतदारसंघात १९ मार्चपासून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली होती. मंगळवारी सायंकाळी प्रचार थांबवावा लागणार आहे. या काळात कोणत्याही प्रकारे प्रचार करू नये, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे. सोशल मीडियावर प्रशासन आणि पोलिसांची नजर आहे. 

काँग्रेससाठी पवारांनी केली मोर्चेबांधणी 
- काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी पदयात्रा काढून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर काँग्रेससाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, खासदार ज्योतिरादित्य शिंदे, विजयाशांती, हर्षवर्धन पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जाहीर सभा घेतल्या. मोहिते-पाटील गटाने भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी शरद पवारांनी राष्ट्रवादीचा उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर तालुक्यातील गट विस्कळीत होऊ दिला नाही. सुशीलकुमार श्ािंदे यांनीही पंढरपूर, मोहोळसह शहरामध्ये पदयात्रा काढल्या. 

आंबेडकरांसाठी ओवैसी येऊन गेले 
- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पार्क मैदानावर घेण्यात आलेली जाहीर सभा विशेष ठरली. या सभेला प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी, आमदार इम्तियाज जलिल, आमदार वारीस पठाण, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे आदींची उपस्थिती होती. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर, पुत्र सुजात आंबेडकर यांनी आंबेडकरी चळवळीतील विविध गटांना एकत्र आणले. शहरातील विविध पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी आपला पक्ष सोडून आंबेडकरांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. 

भाजपसाठी मुख्यमंत्र्यांसह पदाधिकाºयांनी  घेतल्या प्रचारसभा 
- डॉ. जयसिद्धेश्वर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री सुरेश प्रभू, अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार, पाशा पटेल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या जाहीर सभा झाल्या. सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यावर असली तरी सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाने प्रचारात सक्रिय सहभाग नोंदविला. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष मीनाक्षी नाईक यांनीही सभा घेतली. दरम्यानच्या काळात पालकमंत्र्यांच्या विरोधात जाहीर बैठका झाल्या. भाजपमधील गटबाजीचे दर्शनही झाले. शिवसेनेचे संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांच्यासह शिवसैनिकांनी सहभाग नोंदविला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची मंगळवारी सकाळी जाहीर सभा होणार आहे. 

Web Title: The sound of campaigning will be held in Solapur Lok Sabha constituency today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.