दक्षिण सोलापुरात ३०० रॅपिड टेस्ट मध्ये २८ जण आढळले पॉझिटिव्ह...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:27 PM2020-07-16T12:27:03+5:302020-07-16T12:39:22+5:30
गुरुवारी एकाच दिवसात २०० चाचण्याचे नियोजन; पळून गेलेला ‘तो' रुग्ण सिव्हिलमध्ये हलविला
सोलापूर: जिल्ह्यात कोरोना संसर्गामध्ये टॉपर असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसात रॅपिड एंटीजन किटद्वारे ३०० चाचण्या केल्या असून यामध्ये २८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डी. व्ही. गायकवाड यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाकडे उपलब्ध झाले आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी उपलब्ध केले आहेत. या कीटनुसार दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी, बोरामणी, वळसंग, मंद्रूप, भंडारकवठे, कंदलगाव, येळेगाव येथे चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये भंडारकवठे, येळेगाव, बोरामणी, वळसंग, कुंभारी परिसरात २८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती, त्याचबरोबर सर्वेक्षणात आढळलेल्या इतर आजारांच्या ज्येष्ठ व्यक्ती आणि रुग्णालयात येऊन गेलेले ज्यांना सर्दी खोकल्याचा त्रास आहे अशा रुग्णांची यादी करून ही टेस्ट घेतली जात आहे.
गुरुवारी एकाच दिवसात दोनशे चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे गायकवाड यांनी सांगितले. तो रुग्ण ‘सिव्हील’मध्ये भंडारकवठे येथे मंगळवारी आठ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत यात एकाच कुटुंबातील सहा जणांना धर्मवीर संभाजी तलावाजवळील केटरिंग कॉलेजच्या ओल्ड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल केले असता यातील एक व्यक्ती बुधवारी सकाळी पावणेआठ वाजता कर्मचाºयांना धक्काबुक्की करून पळून गेला होता.
कर्मचाºयांनी नेहरूनगरपर्यंत पाटला केल्यावर त्याने दगडफेक केली होती. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुपारी मंद्रूप पोलिसांना तो गाव तलावाजवळ आढळला. मंद्रुप पोलिसांनी त्याला सरकारी अँब्युलन्समधून पुन्हा कोविड सेंटरमध्ये दाखल केले, त्याची मानसिक स्थिती नीट नसल्याने पुढील उपचारासाठी गुरुवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले़