सोयाबीन पेरणी ७५ ते १०० मिमी पावसानंतरच करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:28 AM2021-06-09T04:28:07+5:302021-06-09T04:28:07+5:30

पहिल्या पावसावर पेरणी केल्यास जमिनीतील उष्णता ही कमी न झाल्यामुळे अंकुरलेले बियाणे उष्णतेमुळे जळून जाते व बियाणांची उगवणही कमी ...

Sow soybeans only after 75 to 100 mm of rainfall | सोयाबीन पेरणी ७५ ते १०० मिमी पावसानंतरच करा

सोयाबीन पेरणी ७५ ते १०० मिमी पावसानंतरच करा

Next

पहिल्या पावसावर पेरणी केल्यास जमिनीतील उष्णता ही कमी न झाल्यामुळे अंकुरलेले बियाणे उष्णतेमुळे जळून जाते व बियाणांची उगवणही कमी प्रमाणात होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या सूचनांचे पालन करून पेरणी करावी. आपण आपल्या घरचे बियाणे, दुकानातील बियाणे वापरत असाल तर सर्व पोत्यातील बियाणांची उगवण क्षमता तपासून घ्या. शेजारच्या शेतकऱ्याचे बियाणे विकत घेऊन पेरणी करत असाल तरीही त्याची उगवण क्षमता तपासून घ्या. ७० टक्के व त्यापेक्षा जास्त उगवण क्षमतेचे बियाणे पेरणीसाठी वापरावे, अशा सूचना कदम यांनी केल्या आहेत.

बियाणाला पेरणीपूर्वी रायझोबियम व पीएसबी या नत्र व स्फुरद स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणू खतांची बीजप्रक्रिया करावी. यामुळे आपल्या पिकाची उगवण चांगली होऊन पिकास हवेतील नत्र व जमिनीतील स्फुरद या मूलद्रव्यांची उपलब्धता होईल.

पेरणी करताना अठरा इंचावर सोयाबीन पेरणी करावी. अधिक माहितीसाठी किंवा काही अडचण असल्यास कृषी विभागास संपर्क साधावा ही विनंती. चुकीचे नियोजन करू नका, योग्य पाऊस पडल्यानंतरच बीजप्रक्रिया करून पेरणी करावी, असे म्हटले आहे.

खरीप हंगामात सोयाबीनचे पीक हे तीन महिन्यांत काढणीस येते, ते पीक घेतल्यानंतर लगेच रब्बीसाठी ज्वारी, हरभरा किंवा इतर दुसरे पीक घेता येते. शिवाय दरही चांगला मिळत असल्याने लागवड वाढू लागली आहे.

===Photopath===

080621\img-20210608-wa0079.jpg

===Caption===

चालू वर्षी सोयाबीन पेरणी करताय तर थोडे इकडे लक्ष द्या; कृषी विभाग म्हणतो 75 ते 100 मिलिमीटर पाऊस पडल्यावरच पेरणी करा

Web Title: Sow soybeans only after 75 to 100 mm of rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.