सोयाबीनला विक्रमी सात हजार रुपये दर, ज्वारी अन् गव्हाच्या दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:21 AM2021-04-16T04:21:41+5:302021-04-16T04:21:41+5:30

याबाबत अधिक माहिती देताना आजार समितीचे सचिव तुकाराम जगदाळे म्हणाले, सोयाबीनच्या दरात वाढ सुरू असून आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा ...

Soybean prices hit record Rs 7,000, sorghum and wheat prices fall | सोयाबीनला विक्रमी सात हजार रुपये दर, ज्वारी अन् गव्हाच्या दरात घसरण

सोयाबीनला विक्रमी सात हजार रुपये दर, ज्वारी अन् गव्हाच्या दरात घसरण

Next

याबाबत अधिक माहिती देताना आजार समितीचे सचिव तुकाराम जगदाळे म्हणाले, सोयाबीनच्या दरात वाढ सुरू असून आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा उच्चांकी दर मिळाला आहे. प्लॅन्टवर तर सोयाबीन ७ हजार ५०० रुपयांपर्यंत गेले आहे. हरभऱ्याच्या दरात ही किरकोळ वाढ झाली असून ५००० ते ५ हजार २०० पर्यंत विकला जात आहे. त्याची तीन ते चार हजार कट्टे आवक आहे.

सध्या ज्वारीची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असून पावसामुळे ज्वारी खराब झाली आहे. त्यामुळे ज्वारीचे दर कमी झाले आहेत. याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. कमीत कमी 2 हजार रुपये असणारी ज्वारी १४०० रुपयांपासून ४ हजारांपर्यंत विकली जात आहे. चांगल्या मालाला भाव असल्याने मर्चंट असो.चे अध्यक्ष दामोदर काळदाते यांनी सांगितले.

उन्हाळी उडीद ही ४०० कट्टे आवक असून दर ७००० ते ७५०० मिळत आहे. मक्याची ६०० कट्टे आवक आहे आणि दर १४०० ते १६०० रुपये मिळत आहे. अवकाळी पावसामुळे चिंचेवर परिणाम झाला आहे. चिंच काळी पडल्यामुळे ९ ते १० हजार क्विंटल असणारी चिंच ४ ते ६ हजारावर आली आहे. तुरीची ५०० कट्टे आवक असून ६५४० ते ७१०० पर्यंत दर वाढलेले आहेत. तुरीचे दर आणखी वाढतील असा अंदाज आहे, असे खरेदीदार दिलीप गांधी आणि सचिन मडके यांनी सांगितले.

अवकाळीचा गव्हाला फटका

या अवकाळी पावसाचा गव्हाला देखील मोठा फटका बसला आहे. गहू पांढरा पडत आहे. तो १२०० ते १६०० प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे. त्याची ५ हजार कट्टे आवक आहे. मागील वर्षी रेधनच्या गव्हाच्या कारवाईमुळे बार्शी बाजारात व्यापारी गहू खरेदी करताना घाबरत आहे. कारण बाजार समितीची चिठी पट्टी असताना ही कारवाई केली गेली होती. यंदा तर पावसाने गहू पांढरा पडला आहे. त्यामुळे हा गहू शेतकऱ्यांचा की रेशनचा कसा ओळखायचा असा प्रश्न आहे. दुसरीकडे लातूर बाजार समितीत गहू १७०० ते ३००० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे.

Web Title: Soybean prices hit record Rs 7,000, sorghum and wheat prices fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.